समीर वानखेडेंकडे 70 हजाराचं शर्ट, 2 लाखांचे बूट, 15 कोटींची संपत्ती, नवाब मलिकांनी लावली आरोपांची माळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवली. मलिक यांनी थेट वानखेडेंच्या राहणीमानावरच हल्ला चढवला. (Sameer Wankhede Dismisses 'Expensive Clothes', says Nawab Malik)

समीर वानखेडेंकडे 70 हजाराचं शर्ट, 2 लाखांचे बूट, 15 कोटींची संपत्ती, नवाब मलिकांनी लावली आरोपांची माळ
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 4:05 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवली. मलिक यांनी थेट वानखेडेंच्या राहणीमानावरच हल्ला चढवला. समीर वानखेडेंकडे 70 हजार शर्ट, 2 लाखांचे बूट आणि 15 कोटींची संपत्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोपांची माळच लावली. वानखेडेंकडे महागडे बूट आहेत. लुई वेटॉनच्या बुटांची किंमत 2-2 लाख रुपये आहे. ते नेहमी बूट बदलत असतात. त्यांचं शर्टही 50 हजारापेक्षा अधिक किंमतीचं आहे. टी शर्टची किंमत 30 हजारापासून सुरू होते. ते जी ट्राऊजर परिधान करतात त्याची किंमत लाखो आहे. तर शर्टची किंमत 70 हजार रुपये आहे. त्याशिवाय ते 25 ते 30 लाखाचं घड्याळ वापरतात, असा दावा मलिक यांनी केला.

14 महिने झाले तरी केस का बंद होत नाही?

2020मध्ये वानखेडे आल्यानंतर एक केस नोंदवली आहे. सारा अली खानला बोलावण्यात आलं. त्याच प्रकरणात श्रद्धा कपूरला बोलावण्यात आलं. त्याच प्रकरणात नंतर दीपिका पदुकोणलाही बोलावलं गेलं. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीजला या केसमध्ये बोलावण्यात आलं आहे. अजूनपर्यंत ती केस बंद झालेली नाही आणि त्याबाबत चार्जशीटही दाखल करण्यात आलेली नाही. 14 महिने झाले तरी ही केस बंद होत नाही. त्यात असे काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. याच केसमध्ये कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मालदीवमध्ये ही वसुली करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला.

मालदीवचा दौरा इतका सोपा नव्हता

आम्ही दोन फोटो पोस्ट केले आहेत. एक मालदीवचा आणि दुसरा दुबईचा आहे. मी दुबईत गेलो नाही. बहीण गेली होती हे म्हणणं बरोबर नाही. तुम्ही मालदीवला होता. मालदीवचा दौरा सोपा नव्हता. एवढे लोक गेले म्हणजे 20-30 लाखाचा खर्च येतोच. एनसीबीच्या व्हजिलन्स टीमने त्याची चौकशी करावी. अनेक अधिकारी टीव्हीवर येतात. त्यांचं शर्ट हजार पाचशेचं असतं. खूप महागडं नसतं, असं त्यांनी सांगितलं.

हे तर मोदींच्याही पुढे गेले

समीर वानखेडेंचं शर्ट 70 हजार रुपयांचं कसं? त्यांची पँट लाखाची, पट्टा दोन लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घडी 50 लाखांची, रोज नवीन कपडे घालतात. हे तर मोदींच्याही पुढे निघाले. एखादा अधिकारी एवढे महागडे कपडे घालत असेल तर तो प्रामाणिक कसा? असा सवालच त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

‘मंत्रिमंडळाला नैतिक अधिकार उरला नाही, उद्धवजी… आता तरी सरकार बरखास्त करा’, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

वसूली गँगचा पर्दाफाश होतोय, वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार, मलिकांचा दावा

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव

(Sameer Wankhede Dismisses ‘Expensive Clothes’, says Nawab Malik)

तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.