काल पत्रकारांचे प्रश्न टाळले, आता व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच सोडला? समीर वानखेडेंचं चाललंय काय?

क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीचं देशभरातून कौतुक होत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या कारवाईबाबतचा गौप्यस्फोट केला. (Sameer Wankhede quit the whatsapp group of selective journalism)

काल पत्रकारांचे प्रश्न टाळले, आता व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच सोडला? समीर वानखेडेंचं चाललंय काय?
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 1:49 PM

मुंबई: क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीचं देशभरातून कौतुक होत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या कारवाईबाबतचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. त्यानंतर आज वानखेडे यांनी पत्रकारांचा व्हॉट्सअ‍ॅपग्रुपच सोडला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मलिकांचे आरोप काय?

नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन थेट एनसीबीच्या कारवाईवरच सवाल उपस्थित केला होता. एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलंच नाही, असा दवाही त्यांनी केला. तसेच मनिष भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवाल मलिक यांनी केला होता. एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढणायत आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही. तो भाजपचा कार्यकर्ता मनिष भानुशाली आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही असं सांगण्यात आलं. मग हा व्यक्ती नक्की कोण? असा सवालही त्यांनी केला होता.

वानखेडेंनी उत्तरे टाळली

त्यानंतर समीर वानखेडे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. क्रूझ आणि अंधेरी येथे करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. 2 तारखेला आम्ही कारवाई केली, त्यावेळी वेगवेगळे ड्रग्स सापडले, त्यावेळी आठ लोकांना अटक केली. मोहक जैस्वालच्या माहितीनंतर अब्दुल कादीर शेखला अटक केली, एमडी ड्रग्ज सापडलं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला गोरेगाव मुंबईला ही कारवाई केली, श्रेयस नायरला अटक केली. मनीषकडे हायड्रोफोनिक वीड सापडलं. प्रभाकर साईल, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर हे वैयक्तिक साक्षीदार आहेत. जे आरोप आमच्यावर होत आहेत ते चुकीचे आहेत, याचा थेट संबंध यापूर्वी केलेल्या कारवाईशी आहे. कोकेन, चरस आदी ड्रग्स सापडलेत, असंही एनसीबीनं स्पष्ट केलंय. मात्र, त्यानंतरही पत्रकारांनी मलिकांच्या आरोपांवर वानखेडे यांना बोलतं केलं. पण वानखेडे यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.

आज व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला

समीर वानखेडे हे काही मोजक्या पत्रकारांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आहेत. पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी मलिक यांच्या या आरोपावरून वानखेडे यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून रिअ‍ॅक्शन विचारण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांच्या प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्याने वानखेडे यांनी अखेर या ग्रुपमध्येच बाहेर पडणं पसंत केलं. मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या टीमवर केलेल्या आरोपानंतर वानखेडे हे चिडचिडे झाल्यानेच त्यांनी ग्रुप सोडल्याचं सांगितलं जात आहे. मलिक यांच्या आरोपांवर एनसीबीने व्यवस्थित उत्तर न दिल्यानेच वानखेडे हे घेऱ्यात आले असल्याचंही सांगितलं जात आहे. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनीही वानखेडे यांनी पत्रकारांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्याचं ट्विट केलं आहे.

संबंधित बातम्या:

रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?

अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत, आयकरच्या धाडीवर राष्ट्रवादी प्रदेशांची पहिली प्रतिक्रिया

माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का, अजित पवारांचा संताप

(Sameer Wankhede quit the whatsapp group of selective journalism)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.