उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का? क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा भावनिक सवाल क्रांती रेडकरने पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 

उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का? क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
क्रांती रेडकर आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 11:09 AM

मुंबई :  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा भावनिक सवाल क्रांती रेडकरने पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुला रंगलेला आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच त्यांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नावेही घोषित केली आहेत. अशातच आज सकाळी क्रांतीने मुख्यमंत्र्यांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. ट्विटरवरुन तिने ते पत्र पोस्ट केलं आहे.

क्रांती रेडकरने मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जशास तसं…!

“माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे..”

“सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत.. मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा काहीही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे..”

“आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.”

आपली बहिण,

क्रांती रेडकर

(Sameer Wankhede wife actress Kranti Redkar wrote letter to CM Uddhav Thackeray)

हे ही वाचा :

KP Gosavi | अखेर के पी गोसावी पुणे पोलिसांच्या जाळ्यात, सकाळीच अटकेची कारवाई

समीर वानखेडेंच्याविरोधात अखेर ठाकरे सरकारची चौकशीची घोषणा, 4 अधिकाऱ्यांची नावही जाहीर, 25 कोटीच्या डीलच्या आरोपाची झडती

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.