AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022 : मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना माहीत, संजय राऊतांचा घोडेबाजारीचा आरोप संजय मामा शिंदेंनी फेटाळला

काही जे घोडे असतात बाजारातील नेहमीचे ते विकले गेले. जास्त बोली लागली, असे मला वाटते. त्यामुळे आमचा पराभव झाला. अपक्षांची सहा मते होती, ती आम्हाला मिळाली नाहीत. मात्र महाविकास आघाडीसोबत असलेल्या पक्षांची मते फुटली नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

Rajya Sabha Election Results 2022 : मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना माहीत, संजय राऊतांचा घोडेबाजारीचा आरोप संजय मामा शिंदेंनी फेटाळला
अपक्ष आमदार संजय मामा शिंदेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 11, 2022 | 12:14 PM
Share

सोलापूर : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अपक्षांना ज्या सूचना केल्या होत्या, त्याचे पालन करून मतदान केले. शिवसेनेच्या कोट्यातून मतदान करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिवसेनेचे अनिल देसाई आल्याशिवाय आम्ही अपक्ष मतदान केले नाही, असे स्पष्टीकरण करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे (Sanjay MaMa Shinde) यांनी दिले आहे. ते सोलापुरात बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना (Uddhav Thackeray) माहीत, असे पलटवार त्यांनी केला आहे. दरम्यान, पराभव का झाला याबद्दल वरिष्ठ नेते मंडळीच सांगतील. आम्हाला ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते, त्यानुसारच मतदान केल्याचे स्पष्टीकरण संजय मामा शिंदे यांनी दिले आहे.

‘सूचनांचे पालन केले’

मी एकटाच अपक्ष आहे असे नाही. अनेक अपक्ष आमदार आहेत. माझ्या नावाची चर्चा तर होतेच आहे. मात्र दोन्ही बाजूने होतच राहणार, असे सांगताना महाविकास आघाडीत अपक्षांकडून मत फुटण्याचा प्रकार घडलेला नाही, असे संजय मामा शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीकडून ज्या ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचे पालन केले. कोणालाही संपर्क करू नका, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पालन केले. मुंबईला गेलो नव्हतो, तेव्हाही माझ्या नावाची चर्चा होत होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?

काही जे घोडे असतात बाजारातील नेहमीचे ते विकले गेले. जास्त बोली लागली, असे मला वाटते. त्यामुळे आमचा पराभव झाला. अपक्षांची सहा मते होती, ती आम्हाला मिळाली नाहीत. मात्र महाविकास आघाडीसोबत असलेल्या पक्षांची मते फुटली नाहीत. आम्ही कोणत्याही व्यापारात सहभागी झालो नाही. शब्द देऊन ज्यांनी दगाबाजी केली, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे संजय राऊत म्हणाले. हरभरे टाकल्यावर ते कुठेही जातात, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी नावाचा उल्लेख करत अपक्षांवर टीका केली.

संजय राऊतांचा अपक्षांवर आरोप

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान