
कुणाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, आजा-पंजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही असे खणखणीत उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्या वक्तव्याचा आज खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी सरकारवर घणाघात करताना महाराष्ट्र ही रंगकर्मींची भूमी असून नाट्यचळवळी आपल्याला माहिती असल्याचा खोचक टोला फडणवीस यांना लगावला.
सरकार आणि सत्ताधारी माजलेत
राज्यातील सरकार आणि सत्ताधारी माजलेत अशी तिखट प्रतिक्रिया आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी दिली. विधीमंडळाच्या आवारात काल ज्या घटना घडल्या. महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला, त्याला राज्यातील सरकारची, भाजपची धोरणं कारणीभूत असल्याचा आरोप राऊतांनी केला.
उद्या जर दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांना ही भाजपा प्रवेश देईल. ते इतके वर्ष देशाबाहेर आहेत. त्यांच्यावर हल्ली कोणताही गुन्हा नाही, असे सांगतील. नाशिकमध्ये जसे गुन्हे मागे घेतले, तसे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेते जातील, कारण त्यांना आमच्या सारख्या विरोधकांना संपवायचे असल्याचा आरोप राऊतांनी केला. विधान भवनात त्यांना एका आमदाराची हत्याच करायची होती मकोकाचे आरोपी विधिमंडळाच्या प्रत्यक्षात दारात उभे राहून मारामारी करत आहेत तुमच्या आमदाराची एवढे हीमत कशी वाढते. गुन्हेगारांना आमदार व्हायचंय खासदार व्हायचं आणि संरक्षण घ्यायचं आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपचा बाप मुंबई तोडणार
मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आहे कशी हे त्याने महाराष्ट्राला समजून सांगितलं पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने मराठी भाषेवर हिंदी सक्ती लागत आहात. आख्खी मुंबई तुम्ही गौतम अडाणीचा हातात देत आहात गुजराती एका उद्योगपतीच्या हातात देत आहात. विज बिलाचा कनेक्शन हे सुद्धा गुजरातच्या व्यापाराला दिलेले आहात मुंबईतला गिरणी कामगार हा कर्जाच्या पुढे फेकला जात आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाची घर घ्यायची ताकद तुम्ही ठेवली नाही. एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे गिरगाव चौपाटीवर सगळ्या मराठी माणसांना बोलून सांगावा या गोष्टीमुळे मराठी माणसाचा मुंबईवर हक्क आहे आणि हे कोण दुबे आव्हान देत आहेत. विधिमंडळाच्या मंचावर मराठी माणसाला फसवण बंद करा असे आवाहन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले.
भाजपचा बाप मुंबई तोडणार आहे, असा आरोप राऊतांनी केला. कोणाचा बाप ही नाटकी भाषा करू नका. महाराष्ट्र ही नाट्य पंढरी आहे. इथे नटसम्राट खूप निर्माण झाले आहे. कोणाचा बाप कोणाचा आजा कोणाचा पंजा मुंबई तोडण्याचा काम हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचे आणि ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. तुम्हाला पैसे हवे आहेत संपत्ती हवी आहे आणि सरकार मारामारीला समर्थन देत आहे, असा घणाघात त्यांनी घातला.
राज ठाकरे यांना समर्थन
राज ठाकरे यांचं जे आव्हान आहे ते एका दुबेला नाही भारतीय जनता पक्षाला आहे. दुबे हा भारतीय जनता पक्षाचा पुढारी आणि खासदार आहे. आणि या दुबेचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी केलेल्या मला दिसला नाही. नाराजी काय व्यक्त करत आहात शेंबूड फुसल्यासारखं. तुम्ही मराठी मराठी बोलत आहात. एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आवाहन देतो. महाराष्ट्राला आवाहन देतो. मराठी माणसाला मारण्याची भाषा करतो आणि हे भाजपचे आणि मिंधे गटाचे लाचार मान खाली करून बसले आहेत. राज ठाकरे काय चुकीचेबोलले आम्ही सुद्धा त्याच मताचे आहोत आणि म्हणून तर दोन ठाकरे एकत्र आले त्या विषयावर शंभर टक्के आम्ही एकत्र आहोत असे संजय राऊत म्हणाले.