AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा दिल्लीचे ‘चरणदास’; संजय राऊत यांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीवर टीका केली आहे. आजारी माणसाला लोक भेटायला जातात. पण आजारी माणूसच इतरांना भेटायला जात असल्याचं मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. खरं तर अमित शाह यांनी त्यांची भेट घ्यायला हवी होती. पण इथे तर उलटच घडत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

अजितदादा दिल्लीचे 'चरणदास'; संजय राऊत यांचा हल्लाबोल
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2023 | 1:50 PM
Share

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाल्याची चर्चा आहे. अजितदादा हे आजारी असतानाही अमित शाह यांना भेटायला गेले. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीचं कारण काहीही असेल. पण मराठ्यांनी राजकारणातला स्वाभिमान विकाला आहे. ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते.

तुम्ही आजारी आहात. कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही. तुम्हाला थकवा आला आहे. शरीर कमजोर झालं आहे. दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटणार नाही, असं तुम्ही सांगितलं. ठिक आहे, तो तुमचा प्रश्न आहे. साधारणपणे आजारी असलेल्या माणसाला लोक भेटायला येतात. पण मी पहिल्यांदाच पाहिलं डेंग्यूने आजारी असलेला माणूस त्याच्या नेत्याला भेटायला गेल्याचं पाहिलं. हे दुर्देव आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

अमित शाह यांनी भेटावं

त्यांना डेंग्यू झालेला आहे. त्यांना मी चालताना पाहिलं. त्यांचे खांदे खाली आले आहेत. ते आजारी असल्याचं स्पष्ट दिसतं. अजितदादांना विश्रांतीची गरज आहे. उलट त्यांनाच दिल्लीतील प्रमुख नेत्यांना भेटायला आले पाहिजे. शरद पवार यांच्या घरातून एक बडा नेता फोडला, या नेत्यासोबत 40 आमदार आहेत, अशा नेत्याला स्वत: अमित शाह यांनी येऊन भेटलं पाहिजे होतं. पण आजारी माणसाला अंथरुणातून उठून दिल्लीला जावं लागलं ही महाराष्ट्रावर आलेली वेळ आहे, अशी टीका त्यांनी केली.

आम्हालाही कुटुंब आहे ना?

पवार कुटुंब एकत्र आलं होतं. त्यावरूनही त्यांनी टीका केली. असं असेल तर कार्यकर्ते डोके फोडतील एकमेकांचे. हे संभ्रमाचे चित्र तयार केलं जात आहे. त्यावर विचार करण्याची गरज आहे. कुटुंब आहे ठिक आहे. आमचंही कुटुंब आहे. उद्धव ठाकरे यांना कुटुंब नाही का? एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आमचेही जीवश्चकंठश्च मित्र होते ना? होतेच. त्यांच्याबरोबरचे अनेक लोकं गेले. गेलेल्या लोकांसोबतही आमचे घरोब्याचे संबंध होते. पण तुम्ही महाराष्ट्राच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. त्यामुळे तुमच्याशी संबंध कसा असू शकतो?; असं राऊत म्हणाले.

राष्ट्रवादीत संभ्रम

युद्धभूमीत काका, मामा, भाऊ हे नातं नसतं. फक्त शस्त्र असतं, हे श्रीकृष्णाने सांगितलंय. आपल्याला युद्ध जिंकायचं आहे. संभ्रम निर्माण करायचा नाही. आम्ही एक प्रखर हिंदुत्ववादी म्हणून श्रीकृष्णाचा संदेश पाळतो. युद्धभूमीवर लढायचं असतं. तुम्ही एकत्र बसून सर्वांनी चकल्या लाडू खायचे. आम्ही खायचे आणि कार्यकर्त्यांनी लढायचं असं नाही चालणार, मी या मताचा आहे. उद्धव ठाकरे त्याच मताचे आहेत. काँग्रेसही त्याच मताची असेल. यामुळे राष्ट्रवादी पक्षातही संभ्रमाचं वातावरण होऊ शकतं. हे मी कशाला बोलावं. ते बघतील, असंही ते म्हणाले.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी