AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: त्यांच्या घरात बॉम्ब… संजय राऊत यांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब, मुंबई पोलिस आयुक्तांकडे ती गंभीर तक्रार

Sanjay Raut on MP Sanjay Dina Patil: ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे सेना आमने-सामने आली आहे. संजय राऊत जातीने याभागात आता हजर आहेत. संजय राऊत आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यातील वाद पेटला आहे. त्यातच राऊतांनी लेटर बॉम्ब टाकला आहे.

Sanjay Raut: त्यांच्या घरात बॉम्ब... संजय राऊत यांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब, मुंबई पोलिस आयुक्तांकडे ती गंभीर तक्रार
संजय राऊत. संजय दिना पाटीलImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 25, 2026 | 10:00 AM
Share

Sanjay Raut on MP Sanjay Dina Patil: उद्धव सेनेतून फुटून बाहेर पडलेले आणि शिंदे सेनेत दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात वाद शिगेला पोहचला आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमने-सामने आल्या आहेत. राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी  समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. दरम्यान राऊतांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात लेटर बॉम्ब टाकला आहे. त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिले आहे.

संजय राऊत यांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब

संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटलांवर एक लेटर बॉम्ब टाकला आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना त्यांनी हे पत्र पाठवले आहे. त्यात असे म्हटले आहे की, “एका गंभीर बाबीकडे मी आपले लक्ष वेधत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या अनतेत कमालीचा संताप असून मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणे, लोकप्रतिनिधीस आब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील ‘फुटीर खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. श्री. पाटील म्हणतात. “माझ्या नावाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन.” असा उल्लेख राऊत यांनी या पत्रात केली आहे.

पत्रात त्या धमकीचा उल्लेख

खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात खासदार संजय दिना पाटील यांनी काय धमकी दिली त्याचा उल्लेख केला आहे. “मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे. (ठार केलेले हे ५ लोक कोण व संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्याविरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा.) “माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन.” अशी धमकी संजय दिना पाटील यांनी दिल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे.

त्यांच्या घरात बॉम्ब…

या पत्रात संजय राऊत यांनी खासदार पाटील यांच्या घराची झाडाझडती घेण्याची विनंती केली आहे. “खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA खाली अटक होणे गरजेचे आहे.” अशी मागणी राऊतांनी केली आहे.

त्यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. खास दार पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण