AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करमचंद जासूस…गुंडांचे सरदार…फेकूचंद…संजय राऊत यांचा जोरदार हल्ला

Sanjay Raut | एकनाथ शिंदे हे गुंडांचे सरदार आहे. ते चोरांची टोळी चालवत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत खंडणीखोर, बलात्कारी, चोर, खून लोक आहेत. जे तुरुंगात असायला हवे, ते मुख्यमंत्र्यांसोबत फिरत आहे. ते फेकूचंद आहेत.

करमचंद जासूस...गुंडांचे सरदार...फेकूचंद...संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
sanjay raut
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 11, 2024 | 11:55 AM
Share

मुंबई, दि. 11 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला. हल्ला करणारे कोण होते? पुण्यात नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी कुख्यात गुंडांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवले. त्यांची परेड केली. दोनशे ते तीनशे गुन्हेगारांना बोलवले होते. परंतु निखिल वागळे आणि आसीम सरदे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना बोलवले नाही. पुण्याचे पोलीस आयुक्ता घाबरले का? आसीम सरोदो, निखिल वागळे यांच्यावर हल्ले करणाऱ्यांचे काय झाले? गुंडांची ओळक परेड हा त्यांचा मोठा शो होता का? कारण आसीम सरोदो, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेडा का केली नाही? असे प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच ही नोटंकी बंद करा. त्या गुंडांची परडे करा. नाहीतर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर भाजप कार्यकर्ते आहेत, असे समजले जाईल, असा हल्ला राऊत यांनी केला.

राज्यातील गुंडगिरीविरोधात मोर्चा

महाराष्ट्रात गुंडगिरी वाढत आहे. रोज खून होत आहे. सरकारमधील मंत्री आणि गुंडाचे फोटो समोर येत आहे. यामुळे सामान्य लोक सुरुक्षित नाही. आता राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, यामुळे आम्ही महाराष्ट्र बंद करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री, राज्यपालांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा विचार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. आम्ही शांत बसणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केला. एकनाथ शिंदे हे गुंडांचे सरदार आहे. ते चोरांची टोळी चालवत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत खंडणीखोर, बलात्कारी, चोर, खून लोक आहेत. जे तुरुंगात असायला हवे, ते मुख्यमंत्र्यांसोबत फिरत आहे. ते फेकूचंद आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यांनी करमचंद जासूस म्हटले. परंतु करमचंद जासूस यांनी किती चांगले काम केले आहे, हे त्यांना माहीत नाही. कारण त्यांचा अभ्यास नाही. त्यांचे वाचन नाही. त्यांचा आसपास विचारवंत, बुद्धवंत असायला हवे. परंतु गुंड आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी केला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच