AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अजिंक्य…संजय राऊत यांचा नेमका दावा काय?

ठाकरे ब्रँड मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. त्याला कोणीच संपवू शकत नाही. हा ब्रँड अजिंक्य आहे. लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी आदर आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अजिंक्य...संजय राऊत यांचा नेमका दावा काय?
संजय राऊत
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 15, 2025 | 12:20 PM
Share

महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंबाने संघर्ष केला आहे. त्याग केला आहे. मराठी माणूस घडवला आहे. ठाकरे कुटुंबियांच्या या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदी, शाह, फडणवीस ठाकरे कुटुंबियांची तुलना करु शकत नाही. फडणवीस यांनी किती पैसा खर्च केला तरी काहीच होणार नाही. विधानसभा निवडणूक लाबाडीपणा करुन जिंकली आहे, परंतु महानगरपालिकेत जनता त्यांना जागा दाखवणार आहे, असा दावा शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे यांची गुरुवारी भेट झाली होती. त्यावरुन राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, फडणवीस यांना वाटते की, माझ्याकडे पैसा आहे, मी सर्वांना नाचवू शकतो. परंतु ठाकरे ब्रँड मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. त्याला कोणीच संपवू शकत नाही. हा ब्रँड अजिंक्य आहे. लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी आदर आहे, असे राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली त्याची सर्व माहिती आपल्याकडे आहे, असा दावाही राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस स्व:ताला मदारी समजत आहे. एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

इस्त्रायल आणि इराण दोन्ही ट्रम्प यांचे ऐकत नाही. इराण आणि इस्त्रायलकडे अणूबॉम्ब आहे. दोन्ही देश आपल्या स्वाभिमानासाठी लढत असल्याचा दावा करत आहे. परंतु आम्ही ऑपेरशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐकून थांबवले. आम्ही त्यांच्या सांगण्यावरुन मागे हटलो. नरेंद्र मोदी आता परराष्ट्र दौऱ्यावर गेले आहे. त्या ठिकाणी ते प्रवचन देणार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

Follow Us
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा