
Sanjay Raut on Devendra Fadnavis : आज सकाळपासून राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीची चर्चा सुरू झाली आहे. तर आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांना त्यांच्याच शब्दात पकडतं जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधतानाच दुसरीकडं शरद पवार यांच्याविषयी सुद्धा मोठं भाष्य केलं. राऊतांनी आज विविध विषय एकाच माळेत गुंफत राजकीय घडामोडींवर सूचक मांडणी केली.
महापाप केलं म्हणून ते मुख्यमंत्री
सकाळच्या पत्रपरिषदेत खासदार संजय राऊतांनी खणखणीत बॅटिंग केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच शब्दात पकडलं. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी फडणवीसांच्या एका विधानाचा आधार घेत त्यांना प्रश्न केला. त्यानुसार गंमतीने सांगतो की, जो नगरसेवक होतो तो पाप केलेला असतो तर जो महापौर होतो तो महापाप केलेला असतो. यावर राऊतांनी खणखणीत उत्तर दिलं. स्वतः फडणवीस नगरसेवक आणि महापौर होते. हे वाक्य फडणवीसच म्हणाले असं म्हणातायना अशी माध्यम प्रतिनिधीला विचारणा करत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द ही नागपूर महापालिकेचे नगरसेवक म्हणून सुरू झाली आहे. मग खूप मोठं पाप केल्यावर ते महापौर झालेत. त्यानंतर मोठं पाप केल्यावर ते आमदार झाले आणि महापाप केल्यावर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
बिनविरोध निवडून आलेली माणसं टोलेजंग
महापालिकेत सध्या बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवाराचं प्रमाण अधिक असल्याबाबत राऊतांनी खास प्रतिक्रिया दिली. सध्या दबावापोटी हा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. तर त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वडिलानंतर त्यांच्या आई निवडणुकीसाठी उभ्या असताना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उमेदवार उभा केला नाही याची आठवण त्यांनी करून दिली. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा बिनविरोध निवडून आले नाहीत असे राऊत म्हणाले.
शिंदे यांना एक दिवसाची बातमी हवी
तर उद्धव सेना आणि काँग्रेसमधून कोणी ना कोणी भाजप अथवा शिंदे सेनेत जात असल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता राऊतांनी या राजकीय फोडाफोडीवर खास उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांना केवळ एका दिवसाची बातमी हवी असते असा टोला त्यांनी लगावला. याला फोडला, त्याला पक्षा घेतले अशा बातम्या येतात. पण जे त्या पक्षात जातात त्याचं पुढं काय होतं हे कोणी विचारतं का? असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार NDA सोबत जाणार?
महापालिका निवडणूक झाल्यानंतर शरद पवार हे भाजपप्रणीत NDA सोबत जातील असा दावा करण्यात येत आहे. तशा चर्चा ही रंगल्या आहेत. त्याचा खासदार संजय राऊत यांनी बोचऱ्या शब्दात समाचार घेतला. शरद पवार हे या वयात असं काही करतील असं वाटत नसल्याचं ते म्हणाले. शरद पवार एनडीएसोबत जाणार नसल्याचे ते म्हणाले. तर शरद पवार आता असा कोणताही डाग लावून घेणार नाहीत असं त्या चर्चांना संजय राऊत यांनी सणसणीत उत्तरं दिलं.