AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक झाली तर स्वागत आहे, नाही झाली तर डबल स्वागत, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर; घोडेबाजारावर मुख्यमंत्र्यांची नजर, विरोधकांना पोलीसी दम

आम्ही आमचा उमेदवार उतरवलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही खात्री आहे, की जेवढी मते हवी आहेत तेवढी मते शिवसेनेकडे आहेत. आघाडीतील इतर उमेदवारदेखील विजय होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

निवडणूक झाली तर स्वागत आहे, नाही झाली तर डबल स्वागत, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर; घोडेबाजारावर मुख्यमंत्र्यांची नजर, विरोधकांना पोलीसी दम
राज्यसभेच्या उमेदवारीवरून भाजपावर टीका करताना संजय राऊतImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 1:57 PM
Share

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje chhatrapati) यांना भाजपाने फसवले आहे. यांना स्वत: उमेदवार टाकायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे, त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते म्हणाले, की ही लोकशाही आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशापद्धतीच्या निवडणुका लढणार असतील, तर सरकारचे सुद्धा बारीक लक्ष आहे. त्यामुळे कोणीही घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. दुसरीकडे, आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे उमेदवार महाराष्ट्रातीलच आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. भाजपाचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावादेखील त्यांनी केला आहे.

‘आमच्याकडे पुरेशी मते’

आम्ही आमचा उमेदवार उतरवलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही खात्री आहे, की जेवढी मते हवी आहेत तेवढी मते शिवसेनेकडे आहेत. आघाडीतील इतर उमेदवारदेखील विजय होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी नाराज असलेल्या काँग्रेसवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की नाराजीबद्दल मी बोलणार नाही. त्यांची कोणत्या विषयावर नाराजी आहे, हे त्यांच्या हायकमांडलाच माहीत. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते यांच्यात नेहमी चर्चा होत असते. त्यामुळे वेगळे काही होत असेल तर त्यातून मार्ग निघतो. दिल्लीतील हायकमांड आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलीच चर्चा होत असते, उद्धव ठाकरे असे नेते आहेत, की ज्यांच्यावर कोणतेही दबावतंत्र नसते, असेही ते म्हणाले.

‘स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायला हवे होते’

काँग्रेसचे जी स्थिती आहे, ती पाहता देशातून खूप कमी लोकांना ते पाठवू शकतात. त्यांनी पाठवायचा उमेदवार ठरवलेला आहे. इम्रान प्रतापगडींना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातून कोणीतरी स्थानिक उमेदवार दिला असता तर नक्कीच चांगली बळकटी पक्षाला मिळाली असती. मला वाटते काँग्रेसने देशाचा विचार केलेला आहे त्यासोबतच इतर राज्यांचा विचार केला आहे, असे वाटत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांची भाजपावर टीका

‘तो त्यांचा अंतर्गत प्रश्न’

भाजपा सरकारला प्रत्युत्तर देणारे चांगले लोक त्यांच्या नजरेत असू शकतात. त्यादृष्टीने त्यांनी हा अभ्यास केला असावा. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी किंवा न द्यावी यावर शिवसेनेने मत व्यक्त करणे चुकीचे आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.