टेलीप्रॉम्प्टर बंद झाल्यामुळे मोदींना काल भाषण देता येत नव्हतं; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. टेलीप्रॉम्प्टर बंद झाल्यामुळे मोदींना काल भाषण देता येत नव्हतं, अशी टीका राऊतांनी केली.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टेलीप्रॉम्पटर बंद झाल्यामुळे लाल किल्लावर पंतप्रधान मोदींना भाषण करता येत नव्हते. देशाचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती अडखळत होता. त्यांना घाम फुटला होता, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊत म्हटले की, ‘काँग्रेसच्या अधिवेशनात रविंद्र टागोर यांनी वंदे मातरम गीत केलं. संघाच्या शिबीरात गीत नव्हतं. काँग्रेसने हे केलं आहे. इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरम हे दोन महाकाव्य आहेत. त्यातील वंदे मातरमची याची गर्जना करत क्रांतिकारक फासावर गेले. सहा कडवी म्हणत गेले नाही. भगत सिंग, सुखदेव हे सहा कडवी म्हणत फासावर गेले नाही. फक्त वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद म्हणत फासावर गेले. भाजपच्या लोकांना यामुळेच इडियट म्हटलं जातं’.
‘इडियट का म्हणतात, हे तुम्ही पाहत आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचं टेलीप्रॉम्पटर बंद झालं. त्यावेळी वाचता येत नव्हतं. माझ्याकडे पूर्ण क्लिप आहे. टेलीप्रॉम्पटर बंद झाल्यावर पंतप्रधान हे राष्ट्राला उद्देशून स्वातंत्र्यदिनी भाषण करत होते. लटपटले, घाम फुटला. त्यांच्याविषयी काय बोलाल. एका मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे विचारावं लागतं. त्यांचा स्वातंत्र्य दिनाशी काय संबंध आहे. नाशिकचे चंपतरायना… त्यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. सगळे इडियट लोक एकत्र करून सरकार चालवलं जात आहे. महाराष्ट्र आणि देशात शोधून शोधून इडियट शोधले जात आहे. त्यानंतर कॅबिनेट, राज्यमंत्री केलं जातं. हे सर्व इडियटचं कॅबिनेट आहे, असं म्हणत राऊतांनी टीका केली.
नालसार प्रकरणावरून मनन मिश्रा यांच्यावर टीका करताना राऊतांनी म्हटलं की, मनन मिश्रा हे 12 वर्षांपासून बार कौन्सिल ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे. निवडणूक वगैरे काही नाही. त्यांच्याविषयी भरपूर माहिती आहे. त्यांना राज्यसभेत आणलं आहे. डॉक्टर आणि वकील अंधभक्त झाले, तर पेशन्ट मरून जातील’. बाबा रामदेव यांच्यावर भाष्य करताना म्हटलं की, बाबा रामदेव यांना सरकार बदलत आहे, हे कळलं आहे. सरकार बदलल्यावर पतंजलीवर धाड पडू शकते. त्यामुळे सरकारवर बोलताना दिसत आहे’.
