AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 31 जानेवारीला मुलीचा साखरपुडा

संजय राऊत यांनी शुक्रवारी शरद पवार यांनाही या साखरपुड्याचे निमंत्रण दिले. त्यासाठी संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. | Sanjay Raut

संजय राऊतांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 31 जानेवारीला मुलीचा साखरपुडा
| Updated on: Jan 15, 2021 | 12:08 PM
Share

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. राऊत यांची कन्या पूर्वशी हिची मल्हार नार्वेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली जाणार आहे. मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र आहेत. येत्या 31 तारखेला पूर्वशी आणि मल्हार यांचा मुंबईत साखरपुडा होणार आहे. या सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut and his family meets Sharad Pawar in Mumbai)

संजय राऊत यांनी शुक्रवारी शरद पवार यांनाही या साखरपुड्याचे निमंत्रण दिले. त्यासाठी संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. सुरुवातीला संजय राऊत यांच्या सिल्व्हर ओकवरील सहकुटुंब भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ही भेट नक्की कोणत्या कारणासाठी आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, थोड्यावेळात ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संजय राऊत सहकुटुंब दैनिक ‘सामना’च्या कार्यालयातही गेले होते.

…मग पंतप्रधान मोदींना दररोज राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा भाजपला टोला

शरद पवार यांची भेट घेऊन सिल्व्हर ओकवरून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला. आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायचा झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दररोज राजीनामा द्यावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीत सध्या कृषी कायद्यांविरोधात मोठे आंदोलन सुरु आहे. ही गंभीर बाब आहे. यावरुन दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत आहेत. मग त्यांनी दररोज राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’वर भेट, कोणत्या विषयांवर चर्चा?

… तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल : शरद पवार

संजय राऊतांच्या भेटीला राष्ट्रवादीची कोअर टीम! काय काय घडले?

(Sanjay Raut and his family meets Sharad Pawar in Mumbai)

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.