…मग पंतप्रधान मोदींना दररोज राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा भाजपला टोला

...मग पंतप्रधान मोदींना दररोज राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा भाजपला टोला
संजय राऊत

सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली आहे.

Rohit Dhamnaskar

|

Jan 15, 2021 | 10:47 AM

मुंबई:  आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायचा झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दररोज राजीनामा द्यावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीत सध्या कृषी कायद्यांविरोधात मोठे आंदोलन सुरु आहे. ही गंभीर बाब आहे. यावरुन दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत आहेत. मग त्यांनी दररोज राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

प्रमुख नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली होती. मात्र, काहीवेळातच ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचे स्पष्ट झाले. संजय राऊत आपल्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीला गेले होेते, असे समजते (Sanjay Raut meet Sharad pawar in Mumbai)

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर वर्षा राऊत यांची दोनदा चौकशीही झाली. हे वादळ शांत होत नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कधी नव्हे इतके संकटात सापडले आहे.

परिणामी आता महाविकासआघाडीतील प्रत्येक नेत्याच्या भेटीगाठीतून कोणते ना कोणते अर्थ काढले जात आहेत. मात्र, संजय राऊत यांची ही सहकुटुंब भेट सर्वांसाठीच अनपेक्षित ठरली. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट आहे की यावेळी संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये कोणती राजकीय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

वर्षा राऊत यांची ‘ईडी’कडून दोनदा चौकशी

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आतापर्यंत वर्षा राऊत यांची दोनदा चौकशी करण्यात आली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. याशिवाय, शिवसेनेचे माजी खासदार आनंदरावर अडसुळ यांचीही ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

(Sanjay Raut meet Sharad pawar in Mumbai)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें