AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण चोरणाऱ्या शिंदे, शाह, आयोगावर मकोका लावा; संजय राऊत यांची मोठी मागणी

संजय राऊत यांनी "धनुष्यबाण" चिन्हाच्या चोरीचा गंभीर आरोप करत शिंदे गट, अमित शाह आणि निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर मकोका लावण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राऊतांनी ही मोठी मागणी केली. 'धनुष्यबाण' आमचा मुद्देमाल असून, तो चोरल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

धनुष्यबाण चोरणाऱ्या शिंदे, शाह, आयोगावर मकोका लावा; संजय राऊत यांची मोठी मागणी
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2026 | 10:43 AM
Share

आमचा धनुष्यबाण चोरण्यात आलेला आहे. तीन चोरांनी ही चोरी केली आहे. ही संघटीत चोरी आहे. त्यांना मकोका लावा. अमित शाह, एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाचे आयुक्त राजेश कुमार यांनी धनुष्यबाण चोरला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची सुनवाणी पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

धनुष्यबाण गोठवण्याचा मागणी तुमच्या वकिलांनी केली. तुम्ही बाळासाहेबांचेच विचार गोठवत आहात, अशी टीका शिंदे गटाकडून होत आहे, याकडे संजय राऊत यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. आमचा धनुष्यबाण चोरीला गेला आहे. आपण चोराला पकडतो, तेव्हा मुद्देमाल जप्त करतो. आधी मुद्देमाल जप्त करा. बाळासाहेबांचा विचार आम्हाला सांगू नका. चोवीस तास मोदी आणि शाह यांचे बूट चाटता. त्यात कोणता आला बाळासाहेबांचा विचार? धनुष्यबाणाची तुम्ही चिंता करू नका. आम्ही आहोत, असं सांगतानाच त्यांना निधी मिळत नाही तर अजून एक फूट पाडा. फुटीत फूट पाडा. निकालानंतर ती फूट पडणारच आहे, असं राऊत म्हणाले.

राणे तडजोडीला तयार

नारायण राणे आणि राऊत यांच्यात कोर्टात मानहानीचा खटला सुरू आहे. यावेळी राणे यांच्याकडून तडजोडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नारायण राणे यांचे वकील काल कोर्टात उलट तपासणी करणार होते. न्यायामूर्ती म्हणाले, आजच प्रकरण संपवू. वेळ झाला आहे. तुम्ही थांबा. त्यामुळे आम्ही थांबलो. राणेंचे वकील सतीश मानेशिंदे आले. त्यांनी तडजोडीचा मसुदा तयार केला आहे. आम्हाला तडजोड करायची आहे, अशी इच्छा कोर्टासमोर व्यक्त केली. कोर्ट असे प्रस्ताव स्वीकारत असते. कोर्ट म्हणाले, ज्यांनी खटला दाखल केला, ते तयार असतील तर करू. माझ्याकडे पुरावे होते. मी पुराव्यानिशी राणेंचा दावा खोडून काढला. राणे खोटे बोलले हे दाखवलं, असं सांगतानाच राणेंचा प्रस्ताव माझ्याकडे आला नाही. आल्यावर बघू. असं राऊत म्हणाले.

तडजोडीचा प्रस्ताव हा माफी किंवा दिलगिरीचा असतो. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही हा खटला शेवटच्या टप्प्यापर्यंत आणला. माझ्या आणि माझ्या पक्षाच्या आत्मसन्मानाची ही लढाई आहे. या प्रकरणात राणेंकडून निवडणूक आयोगावरही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. निवडणूक आयोगाला पैसे दिल्याचा आरोप झाला. आता न्यायालयासमोर काय प्रस्ताव येतो यावर सर्व आवलंबून आहे, असं राऊत म्हणाले.

राष्ट्रपतींना पुस्तक भेट

संजय राऊत यांनी राष्ट्रपतींना देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे प्रबोधनकारांचं पुस्तक पाठवलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रपतींना या पुस्तकाची गरज आहे असं वाटतं. कुणी धार्मिक असणं आवश्यक नाही. धीरेंद्र शास्त्रींनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रीय प्रश्नांवर राष्ट्रपतींशी चर्चा केली. त्यामुळे वाटलं राष्ट्रपतींना प्रबोधनकारांचं पुस्तक पाठवावं. देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे. मोदींनाही पाठवावे लागेल. जे जे धर्माचं अवडंबर माजवत आहेत, बुवाबाजीचं अवडंबर माजवत आहेत, दानपेट्यांची लूट करत आहेत, त्यांना प्रबोधनकारांचं पुस्तक पाठवतो. या पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद करण्याचं काम सुरू आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?