AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी नव्हे पंतप्रधानांनीच जनभावनेचा हक्कभंग केलाय; संजय राऊत यांचा आरोप

भाजपने काल ठराव करून 145 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कोणताही ठराव मांडू शकतात. मी त्यांच्या ठरावाच्या काही गोष्टी वाचल्या.

राहुल गांधी नव्हे पंतप्रधानांनीच जनभावनेचा हक्कभंग केलाय; संजय राऊत यांचा आरोप
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 13, 2023 | 10:38 AM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश या नोटिशीत देण्यात आले आहेत. या नोटिशीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. राहुल गांधी यांना नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लोकभावनेचा हक्कभंग केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बलोताना केला.

राहुल गांधी यांना नोटीस बजावण्याचं कारण नाही. लोकसभेत त्यांनी उद्योगपतीसंबंधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं उत्तर मोदींनी द्यायला हवं होतं. मोदींना विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी मिळाली होती. खरं तर पंतप्रधानांनीच हक्कभंग केला. या जनतेच्या भावनांचा. लोकसभेचा, असं संजय राऊत म्हणाले.

यालाच हुकूमशाही म्हणतात

राहुल गांधी आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याची संधी होती. पण त्यांनी ती घेतली नाही. हा पलायनवाद आहे. हा पळपुटेपणा आहे. तुम्ही संसदेच्या नियमांचा आधार घेऊन सदस्यांना नोटीसा पाठवत आहात यालाच हुकूमशाही म्हणतात, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

मुंबई, ठाणे आम्हीच जिंकू

भाजपने काल ठराव करून 145 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कोणताही ठराव मांडू शकतात. मी त्यांच्या ठरावाच्या काही गोष्टी वाचल्या. 150 काय ते 450चा आकडा देऊ शकतात.

पण मुंबई आणि ठाणे पालिका या पुन्हा शिवसेनेच्या भगव्याखालीच येतील. ज्या राज्याचा मुख्यमंत्री पहिल्या दहामध्ये येत नाही. त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजप कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधी यांना नोटीस कशासाठी?

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरली होती. तसेच दिशाभूल करणारे तथ्य मांडले होते. या प्रकरणी राहुल गांधी यांना ईमेलवरून नोटीस बजावण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. तर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्या भाषणातील ती विधाने संसदेच्या कार्यवाहितून काढण्याची विनंती केली आहे. नियम 380 नुसार कामकाजातून ती विधाने काढावीत असं जोशी यांनी पत्रात म्हटलं आहे.

अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवारीनंतरच बाहेरच्या देशांकडून अदानी यांना कंत्राट मिळत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी किती वेळा अदानी किंवा त्यांच्या कंपनीचे लोक उपस्थित होते? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. त्यालाच आक्षेप घेण्यात आला आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.