AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या ‘त्या’ चार सवालातील हवाच काढली; शाह यांना दिला खोचक सल्ला

भाजपचे नेते अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नांदेडच्या रॅलीतून चार सवाल केले होते. शाह यांच्या या चार प्रश्नातील हवाच संजय राऊत यांनी काढून टाकली आहे.

संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या 'त्या' चार सवालातील हवाच काढली; शाह यांना दिला खोचक सल्ला
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 11, 2023 | 10:45 AM
Share

मुंबई : भाजपचे नेते अमित शाह यांनी नांदेडच्या रॅलीतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार सवाल केले होते. उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं आव्हानच अमित शाह यांनी दिलं होतं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या सवालातील हवाच काढून टाकली आहे. आम्ही या चारही मुद्द्यावर आधीच भूमिका मांडली आहे. आमची भूमिका जगजाहीर आहे, असं सांगतानाच शिवसेनेवर बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

तीन तलाकला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. 370 कलमवर आम्ही संसदेत भाजपला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. जात आणि धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये आणि आर्थिक आरक्षणावर आरक्षण असावं ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. तीच भूमिका आमची कायम आहे, असं सांगतानाच शिवसेनेवर बोलताना राजकीय इतिहासाचा अभ्यास करूनच बोललं पाहिजे. अयोध्येत आम्हीही होतोच. कोणते प्रश्न तुम्ही विचारत आहात? तुम्ही गोंधळलेले आहात. आमच्यासाठी जे चक्रव्यूह निर्माण केलं, त्यात तुम्हीच अडकलेले आहात. तुमचा अभिमन्यू होताना आम्हाला दिसतोय, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

प्रत्येक पक्षात बदल होतोच

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फेरबदलावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी स्वतंत्र पार्टी आहे. शरद पवारांनी त्यांच्या पक्षात काही नव्याने रचना केली. प्रत्येक पक्ष तसं करत असतो. त्यांनी केली असेल तर तो त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. सर्वच पक्षात असे बदल काळानुसार होतात. पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी काही निर्णय घेतले असतील तर भविष्याचा वेध घेऊन घेतले असतील. त्या निर्णयाचे जे काही परिणाम होतील, ते सांभाळायला ते समर्थ आहेत, असं त्यांनी सांगितलं.

अजित पवार नाराज नाही

शरद पवार यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं. अजित पवार नाराज आहेत, असं मला वाटत नाही. तुम्ही चुकीचं बोलत आहात. अजित पवार यांचं महाराष्ट्रात स्थान आहे. ते कायम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त