AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राज, राणे, शिंदे, भाजपला उद्धव ठाकरे यांची भीती आणि…

निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या ही लोकांची भावना आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपातही बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. तिथे ईव्हीएम हद्दपार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात असा हट्ट का करतात त्यावर शंका आहे

राज ठाकरे यांच्या सभेनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राज, राणे, शिंदे, भाजपला उद्धव ठाकरे यांची भीती आणि...
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 23, 2023 | 10:46 AM
Share

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दादरच्या शिवाजी पार्कवरील सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत वादावर भाष्य केलं होतं. नारायण राणे आणि ते स्वत: शिवसेनेतून बाहेर कसे पडले याची माहिती दिली होती. 18 ते 20 वर्षापूर्वीच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि भाजप सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. 20 वर्षानंतरही उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे. याचा अर्थ या नेत्यांना उद्धव ठाकरे यांची भीती आणि धास्ती आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरेंचं भाषण ऐकलं नाही. त्यांचं भाषण वाचण्यात आलं. कुणी तरी भाषणं पाठवत असतात. त्यांच्या पक्षाला 18 वर्ष होऊन गेली. पक्ष वयात आलाय. पण त्यांच्या पक्षाचं काय चाललं ते माहीत नाही. मी माझ्या पक्षाचा विचार करतो. 18 वर्षानंतर ही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर एकनाथ शिंदेही बोलतात, नारायण राणे इतक्या वर्षानंतरही उद्धव ठकारेंवर बोलतात. भाजपही आणि स्वत: राज ठाकरेही उद्धव ठाकरेंवर बोलतात. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांची सर्वच पक्षांना भीती वाटते, असं संजय राऊत म्हणाले.

लगेच यांचं वऱ्हाड येतं

तुम्ही तुमच्या पक्षावर बोला. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यावर बोला. पण तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची धास्ती आणि भय विरोधकांना किती आहे हे दिसून येतं. 20 वर्ष झाली. विसरा त्यांना. तुम्ही तुमचं काम करा. तुमचा पक्ष कुठे आहे?… हे मी प्रत्येकाला सांगतोय. महाराष्ट्राचे प्रश्न पाहा. काय उद्धव ठाकरेंवर बोलता तुम्ही. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली तर लगेच यांचं वऱ्हाड येतं आमच्यापाठोपाठ सभा घ्यायला. त्यामुळे कोण काय बोलतं याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आम्हाला आमची ताकद आणि क्षमता माहीत आहे, असंही ते म्हणाले.

ईव्हीएम हवीच कशाला?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात आज विरोधकांची बैठक होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधी पक्षाचे नेते बैठका बोलावून त्या संदर्भात काही चर्चा घडवत असतात. त्यानुसार आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. अनिल देसाई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ईव्हीएम कशी हॅक होते हे या बैठकीत दाखवलं जाणार आहे. निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या ही लोकांची भावना आहे. आपण मतदान करतो ते ज्यांना केलं ते त्यांना मिळतं का नाही याबाबत लोकांमध्ये शंका आहे. शंका असेल तर ती लोकशाही नाही. जगभरात ईव्हीएम बाद केलं आहे. मोदींच्या प्रिय अमेरिका, रशिया आणि युरोपातही. त्यामुळे भारतात असा हट्ट का करतात त्यावर शंका आहे. बैठकीत काय होईल ते पाहू, असं राऊत म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.