AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार चीनला घाबरते?, मणिपूर हिंसेवरून संजय राऊत यांचं धक्कादायक विधान काय?

मणिपूरमध्ये केंद्रीय मंत्र्याचं घर जाळण्यात आलं आहे. जमावाने केंद्रीय मंत्र्याचं घर पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकार चीनला घाबरते?, मणिपूर हिंसेवरून संजय राऊत यांचं धक्कादायक विधान काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 11:40 AM
Share

मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसा भडकली आहे. काल तर या हिंसेचा भडकाच उडाला. प्रक्षुब्ध जमावाने केंद्रीय मंत्र्याचं घरच पेटवून दिलं. सुदैवाने केंद्रीय मंत्री घराबाहेर होते म्हणून बचावले. नाही तर मोठा अनर्थ ओढवला असता. मणिपूरच्या या हिंसाचारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार कोरडे ओढले आहेत. केंद्र सरकार चीनला घाबरत आहे. त्यामुळेच मणिपूरमध्ये हस्तक्षेप केला जात नसल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मणिपूरमध्ये 100 नवे अतिरेकी घुसल्याचा दावाही राऊत यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी एकावर एक स्फोट केले. माझ्या माहितीनुसार 100 हून अधिक अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले आहेत. हिंसाचार सुरू आहे. लोकांचं पलायन सुरू आहे. केंद्रीय मंत्र्याचं घर जाळलं जात आहे. मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आहे. राज्यपाल भाजपचे आहेत. केंद्रातून कंट्रोल होत आहे. पण तरीही मणिपूर नियंत्रणात आणता येत नाहीये, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

कुठे आहेत गृहमंत्री?

फक्त काश्मीरमध्ये लोक मरतात तेव्हा सरकार राजकारण करतं. मग मणिपूरमध्ये कोण मरत आहे? केवळ हिंदू-मुस्लिम दंगल नसल्याने त्यामुळे सरकार जळणाऱ्या राज्याला महत्त्व देत नाही. कुठे आहेत गृहमंत्री? कुठे आहेत गृहसचिव? राज्य जळत आहे. लाखो लोकांचं पलायन सुरू आहे. पण सरकारकडून साधं स्टेटमेंट नाही. केवळ काश्मीरचंच राजकारण होतं का? इतर राज्यात काही होत असेल तर त्यावर केंद्राने काही बोलूच नये का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

हे केंद्राचं अपयश

केंद्रीय मंत्र्याचं घर जाळलं. सरकारला काय पाहिजे? हे केंद्रीय गृहमंत्र्याचं हे अपयश आहे. मणिपुरात दोन्ही बाजूने हिंदूच मरत आहेत. त्याची दखलही घेतली जात नाही. मणिपूरची हिंसा हे केंद्र सरकारचं अपयश आहे, असंही ते म्हणाले.

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करणार का?

गेल्या तीन महिन्यापासून सीमेवरचं महत्त्वाचं राज्य मणिपूर हिंसेच्या आगीत भडकलेलं दिसतंय. त्यात शेकडो लोकांचा बळी गेला. मोदी अमेरिकेत जाऊन शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना आपल्याच देशातील एक राज्य जळतंय ते दिसत नाही. 100 अतिरेकी घुसलेत त्यावर कारवाई करता येत नाही. 100 पेक्षा जास्त नवे अतिरेकी आहेत.

सीमेपलिकडून आलेले हे अतिरेकी आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत. ती चीनकडून आली की पाकिस्तानकडून की म्यानमारमधून? त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. तुमच्यात चीनशी लढण्याची ताकद नाही. म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. मणिपूरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना चीनची मदत आहे. हे कुठून येतंय? पाकवर सर्जिकल स्ट्राईक करताय, तसा चीनवर करणार का ते सांगा, असं आव्हानच त्यांनी केंद्राला दिलंय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.