राज्यातलं सरकार महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘गांडू बगीचा’; संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसनेचा फुटीर गट शिवसेना हे नाव बदनाम करतोय. शिवसेना या नावाला महती होती, तेज होतं. स्वाभिमानाचं वलय होतं. ते सर्व या फुटीर गटाने धुळीला मिळवलंय. निवडणूक आयोगाने भ्रष्ट आणि फुटीर गटाला शिवसेना हे नाव दिल्यापासून या नावाचं महत्त्व कमी केलं जात आहे. पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा शिवसेना या नावाला तेजोवलय निर्माण करून देऊ, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राज्यातलं सरकार महाराष्ट्राच्या राजकारणातील 'गांडू बगीचा'; संजय राऊत यांचा हल्लाबोल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 10:44 AM

मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 | आदित्य ठाकरे यांचं कुटुंब सोनिया गांधी यांच्यासमोर झुकला, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. शेलार याच्या या टीकेचा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. आमच्याकडचा कचरा तुमच्याकडे गेला आहे. तो कचरा आधी दूर करा. त्यावर बोला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजाराच्या घोटाळ्यावर भाष्य केलं होतं. त्यावर तुम्ही बोलणार आहात का? आहे का तुमची हिंमत? आधी त्यावर बोला मग आमच्याकडे या, असं सांगतानाच राज्यातील सरकार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील गांडू बगीचा आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत मीडियाशी बोलत असताना त्यांना आशिष शेलार यांच्या टीकेबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी कोण आशिष शेलार? असा सवाल केला. अजित पवारांवर बोलता का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींचा आरोप केला. हसन मुश्रीफ, राहुल शेवाळे, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्याविषयी का बोलत नाही? तुमची चड्डी सुटली आहे. लोंबते आहे. नाडी सुटली ना? इक्बाल मिर्चीवर बोलता का? आमचा कचरा तुमच्या डंपिंगमध्ये घेतला ना?

तुम्ही डुकरासारखं त्यात लोळत आहात ना? हा कचरा तुम्ही साफ करता का? मी फक्त आशिष शेलारांना बोलत नाही. भाजपच्या सर्व नेत्यांना बोलतोय. तो मुलुंडचा नागडा पोपटलालही बोलणार आहे का? तुमच्याकडचा कचरा जेसीबी लावून साफ करा. तुम्ही डरपोक आहात, अशी टीका करतानाच सध्याचं भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं सरकार हे हा या महाराष्ट्रातील राजकारणातील गांडू बगिचा आहे. नामदेव ढसाळांचा कविता संग्रह होता गांडू बगिचा. हा गांडू बगिचा आपल्याला महाराष्ट्रात दिसतो, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

तो निधी खासगी कामासाठी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीवरूनही त्यांनी टीका केली. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीपेक्षा आमदार, खासदार सहाय्यता निधी मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. त्यात ठेकेदारांकडून पैसे येत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे हे आमदार, खासदार निधीकडे वळवला जातो. खोक्यातून भरून हा सहाय्यता निधी आमदार, खासदारांच्या घरी पोहोचवला जात आहे. सरकार टिकवण्यासाठी हा खटाटोप आहे.

ज्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आरोग्यविषयक मदत मिळत होती. ती आता मिळत नाही. ज्यांना सहाय्यता निधीला द्यायला असतात ते पैसे खासगी कामासाठी वळवले जातात. उद्धव ठाकरेंनी तो फंड मजबूत केला. पीएम केअर फंडासारखं केलं नाही. कुणी दिला कधी दिला हिशोब नाही. उद्धव ठाकरेंनी तसं केलं नाही, असं राऊत म्हणाले.

31 डिसेंबर नंतर मोठी…

राज्याच्या कॅबिनेटमध्ये गँगवार सुरू आहे. मी आधीच सांगितलं होतं. हे गँगवार सुरू राहील. जोपर्यंत मोठी दुर्घटना होणार नाही तोपर्यंत सुरू राहील. आम्हाला माहीत आहे काय सुरू आहे आणि काय नाही. 31 डिसेंबर नंतर हा गँगवार अधिक वाढेल आणि मोठी दुर्घटना घडेल, असा दावा त्यांनी केला.

27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.