Aamir Khan: हिंदीत बोलू? हा महाराष्ट्र आहे भाऊ… आमिर खानच्या त्या वक्तव्याने वादाला फोडणी, सोशल मीडियावर ट्रोल, तो Video व्हायरल
Aamir Khan on Marathi-Hindi : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या वक्तव्याने वादाला फोडणी बसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानानंतर आमिर खान हा माध्यमांसमोर आला. त्यावेळी त्याने मराठी-हिंदीविषयी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्याला हिंदी भाषिक पट्ट्यात ट्रोल करण्यात येत आहे. काय आहे अपडेट?

Aamir Khan on Marathi-Hindi : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. त्यावेळी आमिर खान याच्यासह अनेक दिग्गजांनी, सेलिब्रिटींनी मतदान केले. यावेळी त्यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. दरम्यान मतदान करून बाहेर पडलेल्या आमिर खानला माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला. त्यावेळी आमिर खान याने मराठीत प्रतिक्रिया दिली. त्यावेळी माध्यमांनी त्यांना हिंदीत प्रतिक्रिया देण्याचा आग्रह धरला. त्यावर हिंदीत बोलू असा सवाल करत आमिरने लागलीच हा महाराष्ट्र आहे, असं म्हटलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. मुंबई निवडणुकीत हिंदी आणि मराठीवरून राजकारण तापले होते. त्यात आमिरच्या वक्तव्याने वाद पेटला आहे.
हिंदी-मराठीवर काय म्हणाले आमिर
Municipal Election 2026
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
आमिर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत मतदान केल्यानंतर मीडियासमोर त्याने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. आमिर खान हा मराठीत बोलत होता. तेव्हा मीडियाने त्याला हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला. तेव्हा आश्चर्याने हिंदीत बोलू? हा महाराष्ट्र आहे भाऊ? अशी प्रतिक्रिया त्याने दिली. त्यावर तुम्ही हिंदी बोललात तर मॅसेज दिल्लीत जाईल असे त्यांना सांगितल्यावर आमिर खानने हिंदीत प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्याने सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर मतदान केंद्रावर सर्व व्यवस्था असल्याचे सांगितले. पण त्याच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावर हिंदी भाषिकांनी आमिर खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
आमिरच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस
या व्हिडिओवर जोरदार कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी आमिर खानला या वादात न पडण्याचा सल्ला दिला आहे. तर एका युझर्सने आमिर खानला हिंदीमुळे तुझी ओळख आहे. तुझे सर्व चित्रपट हिंदीत चालतात. हिंदीमुळे तुझे घर चालते असा टोला लगावला. तर दुसऱ्या एका युझर्सने मग तू हिंदी ऐवजी मराठीत का चित्रपट काढत नाही असा टोला लगावला. तर काहींनी आमिर खान हा गुणी कलावंत असून त्याने मराठीत बोलल्यावर कुणाला इतक्या मिरच्या झोंबायची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या व्हिडिओवर ट्रोलर्स आणि समर्थक भिडलेले दिसले. दरम्यान आमिर खान प्रोडक्शनचा हॅपी पटेल हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे.
