मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून फडणवीस यांनी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. या पंचसूत्री कार्यक्रमानुसार त्यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला आणि सामाजिक न्यायाच्या गोष्टींवर अधिकर भर देत भरपूर घोषणाही केल्या. मात्र, विरोधकांनी या अर्थसंकल्पावर खडसून टीका केली आहे. घोषणांचे फुलोरे असं या अर्थसंकल्पाचं विरोधकांनी वर्णन केलं आहे. तर आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही अर्थसंकल्पाची चिरफाडच करण्यात आली आहे.