VIDEO | निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारने काळे कायदे मागे घेतले: संजय राऊत

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 19, 2021 | 11:14 AM

आता जय-परजयाचा विचार न करता शेतकऱ्यांचा विजय झाला. पण त्यासाठी शेतकऱ्यांना मोठं बलिदान लागलं हे दुर्दैव आहे. पहिल्या दिवसापासून राहुल गांधी आपलं म्हणणं परखडपणे मांडत होते.

VIDEO | निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारने काळे कायदे मागे घेतले: संजय राऊत
पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा 'मन की बात' ऐकली

Follow us on

मुंबई : पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. मोदींनी नवीन कृषी कायदे रद्द करीत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गेल्या दीड वर्षात 450 च्या आसापास शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले

गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणाचा शेतकरी तीन कृषी कायदे, काळे कायदे याविरुद्ध संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठीपणाची होती. काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. या संपूर्ण काळात 450 च्या आसापास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले,आत्महत्या झाल्या. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं. लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. प्रचंड दबावाचं राजकारण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या बाधा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असे संजय राऊत म्हणाले.

निवडणुकीतील पराभवाच्या भितीने काळे कायदे मागे घेतले

यात अर्थात राजकारण असायलाच पाहिजे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपच्या पायाखालची जमिन सरकली. शेतकरी प्रचंड संतापला आहे, तो आपला पराभव करेल. या राजकीय भयातून सुद्धा हे तीन काळे कायदे मागे घेतले असावे. तरीही उशिरा का होईना पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला त्यांचं मी स्वागत करतो. 13 राज्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर महागाई, 5 रुपये का होईना पेट्रोलचा दर कमी झालाय. आता ही शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आग परसरत जाईल. म्हणून हे काळे कायदे मागे घेतलेले आहेत. ही राजकीय पावलं जरी असली तरीसुद्धा हा शहाणपणा सुचला, त्याचं कौतुक करतो, असेही राऊत म्हणाले.

शेतकऱ्यांच्या निमित्ताने देशातील विरोधी पक्ष एकवटला

या सर्वामध्ये शेतकऱ्यांचा विजय तर झालाच. पण या शेतकऱ्यांच्या निमित्ताने देशातील विरोधी पक्ष एकवटला. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहिला. दिल्लीमध्ये राहुल गांधीच्या, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई लढलेलो आहोत. आता जय-परजयाचा विचार न करता शेतकऱ्यांचा विजय झाला. पण त्यासाठी शेतकऱ्यांना मोठं बलिदान लागलं हे दुर्दैव आहे. पहिल्या दिवसापासून राहुल गांधी आपलं म्हणणं परखडपणे मांडत होते. संसदेतही आंदोलन करत राहिले शरद पवारही आपली भूमिका यामध्ये घेत राहिले. त्यामुळे हा सर्वांचा विजय आहे.

ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या मनमानीलाही चाप लावावा लागेल

जनतेच्या दबावामुळे सरकारला तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे एक सरकारला ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांच्या मनमानीला चाप लावावा लागेल, एवढा जनतेचा रेटा वाढेल. तसेच राजकीय विरोधकांना कुचलण्याचे काम सुरु आहे त्याबाबतही जनतेच्या दबावापुढे सरकारला झुकावं लागेल, असे राऊय यांनी सांगितले. (Shiv Sena leader Sanjay Raut’s reaction on agriculture law)

संबंधित बातम्या

Modi On Farm Laws | मोदींनी तीनही वादग्रस्त कायदे मागे घेण्याची घोषणी केली, माफी मागितली पण नेमकं कारण काय सांगितलं?

असं काय वादग्रस्त होतं त्या तीन कृषी कायद्यात, ज्यामुळे पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागली?

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI