Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला का जाणार? संजय शिरसाट यांनी आतली बातमी फोडली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता दिल्लीला जाणार आहेत. नार्वेकर यांनी आपला दिल्लीचा दौरा हा नियोजित दौरा आहे, असं सांगितलं आहे. दुसरीकडे संजय शिरसाट यांनी राहुल नार्वेकर यांच्या या दौऱ्यामागील आतली बातमी सांगितली आहे.

Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला का जाणार? संजय शिरसाट यांनी आतली बातमी फोडली
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 2:43 PM

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडलीय. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आतापर्यंत काय कारवाई केली? या मुद्द्यावरही ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन आठवड्यात काय-काय कारवाई केली याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्याला कोर्टाकडून कोणतीही ऑर्डरची कॉपी आलेली नाही. याबाबतचे आदेश आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण त्याचा अभ्यास करु आणि मग भूमिका मांडू, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली होती. त्यानंतर राहुल नार्वेकर आज दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आलीय. दिल्ली जाण्याचा आपला हा नियोजित दौरा आहे, असं नार्वेकर यांनी सांगितलंय. पण शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी बातमी फोडली आहे.

संजय शिरसाट यांनी नेमकी कोणती बातमी फोडली?

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढच्या रणनीतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी जरी आपला दिल्लीचा दौरा हा नियोजित दौरा असल्याचं सांगितलं असलं तरी, पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींना महत्त्व प्राप्त झालंय.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. कायदे तज्ज्ञ जे मार्गदर्शन करतील त्यानुसार या ठिकाणी कारवाई केली जाईल. यापूर्वीच त्यांनी दोन आठवड्याचा वेळ दिला होता. पण आता घाई जास्त आहे”, असं सांगत संजय शिरसाट यांनी आतली बातमी फोडली आहे. “हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे आम्ही पालन करू. जे काही आदेश आम्हाला देण्यात येतील किंवा जी काही भूमिका आम्हाला मांडायची असेल ती आम्ही योग्य पद्धतीने मांडू”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“एक-दोन दिवसांमध्ये आम्हालाही नोटीस येतील. या नोटीसचे उत्तर आम्ही सुद्धा देऊ. आमची बाजू भक्कम आहे, असं आम्ही यापूर्वी म्हणालो आहोत. आम्ही आताही म्हणतोय”, असं संजय शिरसाट म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली.

“संजय राऊत काय बोलतात? याला काही अर्थ नाहीय. तिरडी कुणाची बांधली आहे हे त्यांना लवकरच समजेल. तिरडी आमची बांधलेली नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडलोय आणि आम्ही आमच्या एक स्वतंत्र पक्ष तयार केलेला आहे, जो आज राज्यात सत्तेत आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.