AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शिवसेना कोकणात राणेंविरोधात भिडणार?; सदा सरवणकरांचं मोठं विधान

दादर, माहीम परिसरात कार्यालय उघडणाऱ्या भाजप आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर कडाडले आहेत. (shiv sena mla sada sarvankar attacks nitesh rane)

आता शिवसेना कोकणात राणेंविरोधात भिडणार?; सदा सरवणकरांचं मोठं विधान
sada sarvankar
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 1:35 PM
Share

मुंबई: दादर, माहीम परिसरात कार्यालय उघडणाऱ्या भाजप आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर कडाडले आहेत. त्यांना कितीही दुकाने उघडू द्या. त्यांना दादर, माहीमच काय कोकणातही जिंकू देणार नाही, असा दावाच सदा सरवणकर यांनी केला आहे. (shiv sena mla sada sarvankar attacks nitesh rane)

दादर-माहीम मतदारसंघाचे शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या हस्ते माहीम इथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी हा इशारा देण्यात आला. भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही. भाजप आणि नितेश राणे यांनी अशी अनेक दुकाने उघडली आहे. त्यांनी कितीही दुकाने उघडू द्या. नितेश राणेंना आम्ही त्यांच्या कोकणातल्या मतदार संघात ही जिंकू देणार नाही, असा इशारा सरवणकर यांनी दिला आहे.

मनसेला पोटशूळ

तर, मुंबई महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचा प्रत्येक गोष्टीत विरोध असतो. मनसेला पोटशूळ येतं. आम्ही शिवाजी पार्कात विद्यूत रोषणाई करत आहोत. मनसे केवळ दिवाळीत रोषणाई करते, असं सांगतानाच शिवसेनेच्या पहिल्यापासून शिवाजी पार्कमध्ये सभा झाल्या मग इतरांनी सभा घेऊ नये असे आम्ही म्हणतो का? शिवाजी पार्कवर सर्वांचाच अधिकार आहे, असं राऊत म्हणाल्या.

राणे काय म्हणाले होते?

दरम्यान, गेल्या महिन्यात भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते माहीममध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.

जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार

मुंबईत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर आमचा जोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कार्यालय स्थापन केलं आहे. आता आम्ही मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाणार. महापालिका निवडणुका येईपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत आमचे काम सुरूच राहील, असं सांगतानाच हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं जातं. जिथे पाणी लोकांना मिळत नाही, तो बालेकिल्ला. जिथे कचऱ्याचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला. जिथे धुळीचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवू आणि उद्या हाच बालेकिल्ला आमचा करू, असंही ते म्हणाले होते. (shiv sena mla sada sarvankar attacks nitesh rane)

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहीत नसावा, राज यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

(shiv sena mla sada sarvankar attacks nitesh rane)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.