Video | शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले की मंगेश कुडाळकर…गौतमी पाटील हिच्या व्हिडिओनंतर…

ShivSena | मुंबईत २८ जानेवारी रोजी कुर्ला फेस्टीवल होत आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात गौतमी पाटील येणार आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ गौतमी पाटील यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला आहे.

Video | शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले की मंगेश कुडाळकर...गौतमी पाटील हिच्या व्हिडिओनंतर...
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 9:22 AM

गिरीश गायकवाड, मुंबई, दि.28 जानेवारी 2024 | शिवसेना कोणाची? याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच दिला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली. त्यांचा व्हिप आता शिवसेनेचा सर्व आमदारांना ऐकावे लागणार आहे. त्यात ठाकरे गटातील आमदार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या निकालास काही दिवस झाले. परंतु आता शिवसेनेचा प्रतोद बदलला की काय? असा प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती समोर आली आहे. नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या व्हिडिओनंतर ही बाब समोर आली आहे. या व्हिडिओनंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्तेही संभ्रात आले आहेत.

काय आहे व्हिडिओ

गौतमी पाटील हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कुर्ला फेस्टीवलसंदर्भातील आहे. त्यात गौतमी पाटील हिने कुर्ला फेस्टीवलमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. २८ जानेवारी रोजी हा फेस्टीवल आयोजित केला आहे. त्यात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. गौतमी पाटील व्हिडिओत म्हणते, नमस्कार, मी गौतमी पाटील. मी येतेय २८ जानेवारी रोजी नेहरुनगर, एसटी डेपो, शिवसृष्टी, कुर्ला (पूर्व) येथे सांयकाळी सात वाजता. कुर्ला फेस्टीवलमध्ये तुम्हाला भेटायला. मला आमंत्रित केलंय शिवसेना प्रतोद, विभागप्रमुख, कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर यांनी…तर मी येतेय, तुम्ही नक्की या…

हे सुद्धा वाचा

गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम

कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी कुर्ला फेस्टीवलचे आयोजन केले आहे. या फेस्टीवलमध्ये त्यांनी गौतमी पाटील हिला बोलवले आहे. यामुळे गौतमी पाटील हिचा व्हिडिओ सोशल मीडियात आला. त्यात शिवसेना प्रतोद असा ऊल्लेख आमदार मंगेश कुडाळकर यांचा केला आहे.

शिवसेना प्रतोद भरत गोगावले असताना मंगेश कुडाळकर यांची नियुक्ती कधी झाली? हा प्रश्न आता शिवसैनिकांनाही पडला. या व्हिडिओची चर्चा सध्या सुरु झाली आहे. या व्हिडिओवर अद्याप शिंदे गट किंवा ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली नाही.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.