AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिंडार! ठाकरे गटाला भीती होती तेच अखेर घडलं, रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आज रात्री अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.

खिंडार! ठाकरे गटाला भीती होती तेच अखेर घडलं, रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश
| Updated on: Mar 10, 2024 | 9:02 PM
Share

मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते. रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरुन शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटाच प्रवेश केला. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे मंचावर होते.रवींद्र वायकर आगे बडो हम तुमारे साथ हैं अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.

आमदार रवींद्र वायकर कोण आहेत?

आमदार रवींद्र वायकर यांची नजिकच्या काळात नेते पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड, हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वायकर यांच्यावर दिली होती. वायकर यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. 1992 मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. तर वायकर पालिकेत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे आहेत. शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती.

2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल, अशी शक्यता होती. पण, रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती.

अनेक वेळा वायकर हे तपास यंत्रणाच्या रडारवर आल्याने चर्चेत आले. यामध्ये कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरो,प तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असलेली चौकशी आणि ईडीकडून सुरु असलेली चौकशी यामुळे वायकर चर्चेत होते. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.