AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या जेलमधील आमदाराला आता ईडी अटक करुन मुंबईत आणणार

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. (NCP MLA Anil Bhosale Ed inquiry)

राष्ट्रवादीच्या जेलमधील आमदाराला आता ईडी अटक करुन मुंबईत आणणार
Anil Bhosale
| Updated on: Mar 05, 2021 | 11:10 PM
Share

पुणे : शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना अटक केली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत. (NCP MLA Anil Bhosale Ed inquiry)

ईडीने गुन्हा दाखल

बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांना (25 फेब्रुवारी) अटक केली होती. सध्या अनिल भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात. यानंतर आता शिवाजीराव भोसले बँकेतील या घोटाळ्याबाबत ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सध्या ईडीकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. या तपासासाठी अनिल भोसले यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.

भोसले यांना अटक करण्याची शक्यता 

याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कोर्टातून भोसले यांचा ताबा घेण्यासाठी ऑर्डर काढण्यात आली आहे. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक पुणे येथे रवाना झालं आहे. त्यामुळे लवकरच अनिल भोसले यांना अटक केली जाणार आहे.

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर शिवाजीराव भोसले बँकेचे कर्ज आहे. धनंजय मुंडे यांनी 1 कोटी 43 लाख रुपये थकवल्याचं बँकेचं म्हणणं आहे. संजय काकडे हे राज्यसभेवरील भाजपचे खासदार आहेत. काकडे आणि भोसले एकमेकांचे व्याही आहेत. काकडेंचे दुसरे व्याहीसुद्धा राजकीय क्षेत्रातील आहेत. संजय काकडे यांची कन्या कोमल माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सून आहे. काकडे-देशमुख कुटुंबाच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (NCP MLA Anil Bhosale Ed inquiry)

संबंधित बातम्या : 

शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक

300 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.