AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांनी रुग्णालयातून शेअर केला पहिला फोटो, हात पाहून खरच मन हळहळलं, पण…

खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी 'हात लिहिता राहिला पाहिजे' असा संदेशही दिला आहे.

संजय राऊतांनी रुग्णालयातून शेअर केला पहिला फोटो, हात पाहून खरच मन हळहळलं, पण...
sanjay raut
| Updated on: Nov 06, 2025 | 1:43 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. यामुळे त्यांना मुंबईतील भांडूपमधील फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत. सध्या त्यांच्यावर आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत. त्यातच आता संजय राऊत यांनी रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे.

संजय राऊतांचा पहिला फोटो समोर

संजय राऊतांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत संजय राऊत हे रुग्णालयातील बेडवर रुग्णाचे कपडे घालून बसल्याची झलक दिसत आहे. यावेळी त्यांच्या हातावर सलाईन लावल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ते एक पेपर आणि पेन हातात धरुन लिहित असल्याचे दिसत आहेत. या पेपरवर एडिट असे लिहिलेल असल्याने अनेकजण ते सामनाचा अग्रलेख लिहित असावे असा अंदाज बांधत आहेत.

संजय राऊत यांनी हे ट्वीट करत त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता! असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांवर फोर्टिस रूग्णालयात उपचार

गेल्या काही दिवसांपासून खासदार राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत. सध्या त्यांन पुढील उपचारांसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले आहेत. वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यावर ते विश्रांतीसाठी आपल्या मैत्री निवास्थानी परतणार असल्याचे बोललं जात आहे.

त्यांनी एक पत्रकही शेअर केले होते. सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकरच याहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवीद असेच राहू द्या, असे संजय राऊत यांनी या पत्रात नमूद केले होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.