AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण जीव जाणार नाही; राजावाडी रुग्णालयाच्या डीनचा दावा

कोरोनाची लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होऊ शकतो. पण तुमचा जीव जाणार नाही. (Some could get Covid infection even after vaccination but not serious, says dr. vidya thakur)

लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण जीव जाणार नाही; राजावाडी रुग्णालयाच्या डीनचा दावा
dr. vidya thakur
| Updated on: Apr 16, 2021 | 4:25 PM
Share

मुंबई: कोरोनाची लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होऊ शकतो. पण तुमचा जीव जाणार नाही. कोरोना झाला तर लक्षणंही सौम्य असतील, असा दावा मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या डीन विद्या ठाकूर यांनी केला आहे. (Some could get Covid infection even after vaccination but not serious, says dr. vidya thakur)

टीव्ही 9 मराठीशी बोलताना विद्या ठाकूर यांनी हा दावा केला आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवायची असेल तर प्रत्येकाचं लसीकरणं होणं गरजेचं. हेच विदेशात झालंय, त्यामुळे तिथे चांगल्याप्रकारे व्हॅक्सिनेशन झालंय. आपल्याकडेही मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची गरज आहे, असं ठाकूर म्हणाल्या.

गर्दी जीवघेणी ठरू शकते, बाहेर जाणं टाळा

कुणालाही घराबाहेर पडण्याची गरज नाहीये. संचारबंदीचं पालन करणं गरजेचं. बाहेर पडून सोशल डिस्टनिंगचं पालन होत नाही, डॉक्टर दिवस रात्र काम करत आहेत, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं लोकांनी टाळावं, सोशल डिस्टन्सचं पालन करतानाच वारंवार हात धुणं गरजेचं आहे. कारण गर्दीत कोविड पसरण्याची शक्यता दाट आहे, ही गर्दी जीवघेणी ठरू शकते, प्रत्येकाने त्रिसूत्रीचं पालन करावं. नियम कुणीही मोडता कामा नये, नाहीतर परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात तब्बल 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 695 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 53 हजार 335 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 59 हजार 56 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मृत्यांचा आकडा 59 हजार 153 वर जाऊन पोहोचला आहे.

मुंबईत 8 हजार नवे रुग्ण

मुंबईत काल दिवसभरात 8 हजार 217 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 10 हजार 97 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्याही चिंताजनक बनली आहे. दिवसभरात मुंबईत 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान मुंबई जिल्ह्यातील कोविड वाढीचा दर 1.64 टक्क्यांवर आला आहे. (Some could get Covid infection even after vaccination but not serious, says dr. vidya thakur)

संबंधित बातम्या:

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

मोठी बातमी ! आता मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारची परवानगी

राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या, विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(Some could get Covid infection even after vaccination but not serious, says dr. vidya thakur)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.