AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानाचा थेट अर्थच सांगितला आहे. (some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 10:54 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानाचा थेट अर्थच सांगितला आहे. कुणी तरी आहे तिथे. त्यांना इथे यायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे. अनेकजण आमच्याकडे येऊ इच्छित आहे. त्यासाठीचं हे विधान होतं, असं सांगत संजय राऊत यांनी धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे भाजपमधील कोण नेते महाविकास आघाडीत येणार या विषयीचे तर्कवितर्क लढवले जात आहे. (some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं. ठाकरेंची स्वत:ची स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्ये ते बोलले. नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल आणि आम्ही या सरकारमधून बाहेर पडू असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, ज्यांना आमचे भावी सहकारी व्हायचं आहे, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातील काही लोकांकडे त्यांनी बोट दाखवून आणि नाव घेऊन त्यांनी विधान केलं. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत… विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी मला माजी म्हणू नका म्हणून सांगितलं त्या त्या बाबतच्याच हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहे. कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे. त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी संकेत दिले. तुम्ही या. बरेच लोकं येऊ इच्छित आहेत. येतीलच आता. चंद्रकांतदादाच म्हणाले 72 तास थांबा म्हणून. काही लोकांनी लगेच पतंग उडवण्यास सुरुवात केली. उडवू द्या. पतंगवर जाते आणि कापली जाते. येईल नंतर खाली, असा चिमटा राऊत यांनी काढला.

शिवसेना शब्द मोडत नाही

पाच वर्ष सरकार चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना नेहमी कमिटमेंट पाळणारी आहे. शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. खासकरून ठाकरे कुटुंबाची. आम्ही त्याच मार्गाने जात असतो. त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायचा असेल त्यांनी तो उडवत बसवावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष त्या आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

काल जिथे बोलले, तिथेच ते विधान संपलं

आता काही होणार नाही आणि कोणी होऊ देणार. भाजपच्या काही लोकांनी शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करणार असल्याची भाषा केली. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची धमकी दिली, अशा विचारधारेचा हा पक्ष आहे. हे त्यांचं कल्चर आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार? युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. आमचं चांगलं चाललंय. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर फडणवीसांच्याही घरी जाईल

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसल्याने अडचण वाटण्याचं कारण नाही. ते दोघेही त्या भागातील मंत्री आहेत. दानवे आणि आम्हीही सोबत बसतो. राजकारणात कडवटपणा नसतो. उद्या फडणवीस भेटले तर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेन. त्यांची ख्याली खुशाली विचारेन. उद्या मला त्यांच्या घरी जावंसं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन. एकमेकांचं तोंडच पाहायचं नाही, एकमेकांशी बोलायचंच नाही, असं महाराष्ट्रातील राजकारण नाही. हे चालत नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही झुकणार नाही

विधानसभेत आम्ही एकत्र आहोत. लोकल लेव्हला भाजपसोबत जाणं ही लोकांशी गद्दारी ठरेल. औरंगाबादमध्ये धर्मांध शक्ती थोपवायला आम्ही तिघे समर्थ आहोत. तसं नसतं तर दोन वर्ष सरकार सुरळीत चाललं नसतं. तिन्ही पक्षात सर्वकाही अलबेल आहे. कुणाच्या मनात किंतू परंतु नाही. या सरकारला नोव्हेंबरमध्ये दोन वर्ष होत आहे. पुढील तीन वर्ष सुद्धा अधिक गतिमान पद्धतीने हे सरकार चालेल. याबद्दल विरोधी पक्षांनी खात्री बाळगावी, असं सांगतानाच. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही गुडघे टेकू, सरेंडर होऊ आणि त्यांना हवं ते करू देऊ असं काही लोकांना वाटत आहे. हा कचरा कुणाच्या डोक्यात असेल तर तो तसाच ठेवा आम्ही झुकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

सह्याद्री गेस्ट हाऊस आणि राजभवनाजवळ वाझेकडून देशमुखांच्या सचिवाला पैशाने भरलेल्या 16 बॅगा; आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचंय त्यांनी खुशाल यावं; आता संजय राऊतांची विरोधकांना खुली ऑफर

रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला

(some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.