ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचंय त्यांनी खुशाल यावं; आता संजय राऊतांची विरोधकांना खुली ऑफर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना खुली ऑफर दिली आहे. (sanjay raut)

ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचंय त्यांनी खुशाल यावं; आता संजय राऊतांची विरोधकांना खुली ऑफर
sanjay raut
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 2:23 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना खुली ऑफर दिली आहे. ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचं त्यांनी खुशाल यावं आणि भावी व्हावं, असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे. (sanjay raut offer opposition leaders to join maha vikas aghadi)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हे आवाहन केलं आहे. ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि भावी व्हावं. आजी सहकारी व्हावं. जे माजी आहेत ते आजी होतील. त्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका, असं राऊत म्हणाले.

दानवे अजातशत्रू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटायला बोलावलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी दानवेंना भेटायला बोलावलं आहे. ते केंद्रीय मंत्री आहेत. मीही त्यांना अनेकदा भेटतो. ते अजातशत्रू आहेत. दानवे सर्वांचे मित्रं आहेत. दानवे जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं, तेही खरं आहे. त्यांना बोलावलं असेल तर चांगलं आहे. ते रेल्वे राज्य मंत्री आहेत. रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. मुंबईचे प्रश्न आहेत. राज्याचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाशी कोणत्याही राज्याचा संवाद राहणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

तीन पैकी एका पक्षात पाटील प्रवेश करू शकतात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसात बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. पाटील यांच्या या विधानाची राऊत यांनी खिल्ली उडवली. त्या दोन दिवसातील 24 तास संपले. आता 24 तास राहिले आहेत. वाट पाहा. ते काय भूकंप करतात ते पाहा. चंद्रकांत पाटील महाविकास सामिल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांच्या विधानवरून दिसू शकतं. तीन पैकी एका पक्षात ते प्रवेश करू असं पाटील यांना वाटत असेल, म्हणून त्यांना माजी राहणार नाही असं म्हटलं असावं. मुख्यमंत्र्यांनीही पाटील तीन पैकी एका पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते नागालँडमध्ये जाणार आहेत. राज्यपाल म्हणून.त्यांच्या अस्वस्थ मनामुळे त्यांना नागालँडच्या राज्यपालपदाची ऑफर दिली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

कोणत्याही पदावर जाऊ शकतो

संजय राऊत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असं विधान पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो ना. मराठी माणूस काहीही होऊ शकतो. जर महाराष्ट्राला माहीत नसताना चंद्रकांत पाटील मंत्री होऊ शकतात तर राऊत आणि शिवसैनिक कोणत्याही पदावर जाऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला.

(sanjay raut offer opposition leaders to join maha vikas aghadi)

संबंधित बातम्या:

उद्धवजींना ‘रिअलाईज’ झाल्यामुळेच आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत : देवेंद्र फडणवीस

आधी ईडी, मग सीबीआय, आता इन्कम टॅक्सकडूनही अनिल देशमुखांवर धाडी!

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय : उद्धव ठाकरे

(sanjay raut offer opposition leaders to join maha vikas aghadi)

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.