AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : विधानसभेपूर्वी शिवडीत ठाकरे गटात धुसफूस, उमेदवारीवरुन संघर्ष उडण्याची चिन्हं? महायुती भाकर फिरवणार?

Shivdi Assembly Election 2024 : विधानसभेपूर्वची दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात वातावरण तापले आहे. शिवडी मतदारसंघात ठाकरे गटात उमेदवारीवरून संघर्ष होण्याची चिन्ह दिसत आहेत. इच्छुकांनी दावा सांगितल्याने बंडाचा गुलीगत धोका नेमका कुणाला असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Uddhav Thackeray : विधानसभेपूर्वी शिवडीत ठाकरे गटात धुसफूस, उमेदवारीवरुन संघर्ष उडण्याची चिन्हं? महायुती भाकर फिरवणार?
शिवडीत कुणाला गुलीगत धोका?
| Updated on: Aug 23, 2024 | 10:29 AM
Share

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने एक डाव धोबीपछाड केला होता. पण आता विधानसभेसाठीची समीकरणं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवडी विधानसभा मतदारसंघात वातावरण तापले आहे. शिवडी मतदारसंघात ठाकरे गटात उमेदवारीवरुन खदखद असल्याचे समोर येत आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी यांनी आतापर्यंत दोनदा शिवडी मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. ते आता तिसऱ्यांदा हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहे. पण उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने बंडाचा गुलीगत धोका कुणाला बसणार आणि महायुतीचा या मतदारसंघातील विजयाचा मार्ग सुकर होणार का? ही चर्चा रंगली आहे.

अजून एक पदाधिकारी इच्छुक

शिवडी विधानसभेमध्ये सध्याचे आमदार अजय चौधरी यांच्या सोबत आणखी पदाधिकारी विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांचे नाव पुढे आहे. अजय चौधरी आणि सुधीर साळवी या दोन्ही उमेदवारांचे पोस्टर शिवडीमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आमदार अजय चौधरी यांच्या समर्थकांकडून चौधरी यांचे पोस्टर व्हायरल केल्याने सुधीर साळवी यांच्या समर्थकांनी पोस्टर व्हायरल केल्याचे समोर येत आहे.

रंगले पोस्टर वॉर

शिवडी विधानसभेत घडणार “इतिहास”… शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवणार चौधरी साहेब हॅट्रिक मारणार असं पोस्टर सोशल शिवडीमध्ये मीडियावर व्हायरल केल होतं. तर बदल हवा आमदार नवा… शिवडी विधानसभेत एकच पुकार आता हवा शिवसेना पक्षाचा युवा आमदार असं आशयाचे पोस्टर सुधीर साळवी यांच्या समर्थकांकडून वायरल करण्यात आलं आहे.

या दोन्ही पोस्टरमुळे आगामी विधानसभेत ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून संघर्ष सुरु झाला आहे. विधानसभा जवळ येत असताना दोन्ही उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेंच दिसून येत आहे. गेले दोन टर्म अजय चौधरी शिवडी विधानसभेचे आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गटनेते पदाची जबाबदारी पण अजय चौधरी यांच्यावर देण्यात आली होती.

बाळा नांदगावकर पण मैदानात

सुधीर साळवी हे लालबागच्या राजाचे मानद सचिव आहेत. गेली 10 वर्ष शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. दुसरीकडे मनसेकडून बाळा नांदगावकर यांची शिवडी विधानसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुती भाकर फिरवणार?

महाविकास आघाडीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. या भागातील वर्चस्व ठाकरे गटाने दाखवून दिले. पण शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घटल्याची चिंता पण ठाकरे गटाला सतावत आहे. अशात उमेदवारीवरुन होणारी धुसफूस वेळीच रोखली नाही तर महायुती भाकर फिरवणार तर नाही ना? अशी चर्चा होत आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...