कोरोनापासून वाचण्यासाठी मुंबई पोलिसांचा खास संदेश, अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’मधील सीनचा वापर

कोरोनाबाबतही मुंबई पोलिसांनी लोकांच्या जागृतीसाठी असाच हटके अंदाज वापरला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला हा संदेश समाज माध्यमांवर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी मुंबई पोलिसांचा खास संदेश, अमिताभ बच्चन यांच्या 'अग्निपथ'मधील सीनचा वापर
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:40 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक खास संदेश दिला आहे. रस्ते सुरक्षा सप्ताह, अनेक सामाजिक गोष्टींबाबत मुंबई पोलीस हटके अंदाजात लोकांची जनजागृती करत असतात. कोरोनाबाबतही मुंबई पोलिसांनी लोकांच्या जागृतीसाठी असाच हटके अंदाज वापरला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला हा संदेश समाज माध्यमांवर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.(Special message of Mumbai Police for public awareness about Corona)

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा 1990 मध्ये आलेला अग्निपथ सिनेमातील एका सीनचा वापर करुन मुंबई पोलिसांनी आपल्या इन्स्टाग्राम उकाऊंटवरून कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओद्वारे पोलिसांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नागरिकांनी हात धुवावे याबाबत संदेश दिली आहे. या व्हिडीओसह मुंबई पोलिसांनी “क्या आपने कभी जाजने की कोशिश कि कि मां को क्या पसंद है?” असं एक कॅप्शन दिलं आहे

हात धुवा, कोरोना दूर करा

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हे जेवायला बसत असतात. त्यावेळी या चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका करणाऱ्या रोहिणी हट्टंगडी अमिताभ यांना रागावतात. रोहिणी हट्टंगडी अमिताभ यांना जेवणापूर्वी हात धुण्यास सांगतात. हा व्हिडीओ “अपने हाथों को धो लें, कोरोना को दूर करें” हा संदेश देत संपतो. या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह रोहिणी हट्टंगडी आणि नीलम कोठारी पाहायला मिळतात. या व्हिडीओमध्ये तीनही कलाकार जेवणापूर्वी हात धुण्याबद्दल चर्चा करत असतात.

समाजमाध्यमांवर मुंबई पोलिसांचं कौतुक

मुंबई पोलिसांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकलेला हा व्हिडीओ आणि कोरोनापासून वाचण्यासाठी दिलेल्या संदेश लोकांच्या पसंतीला उतरत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांचं कौतुक करतानाच या व्हिडीओवर लोक प्रतिक्रियाही देत आहेत. एका सोशल मीडिया युजरने म्हटलं आहे की, आई नेहमी बरोबर असते. तर एकाने मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीला दाद दिली आहे.

संबंधित बातम्या :

‘मास्क’चा वापर टाळणाऱ्या 22 हजार 976 नागरिकांना एका दिवसात तब्बल 46 लाख रुपयांचा दंड

मास्क न घालणाऱ्या पुणेकरांना धडा, पोलिसांची 2 लाख 28 हजार जणांवर कारवाई

Special message of Mumbai Police for public awareness about Corona

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.