कल्याणचा पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक

कल्याण : आज मध्य रेल्वेच्या कल्याण-डोंबिवली मार्गावर सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक आहे. कल्याणचा सर्वात जुना पत्रीपूल पाडण्यासाठी हा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली मार्गावरील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मध्य रेल्वेकडून 140 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले. गरज असेल तरच प्रवास […]

कल्याणचा पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 5:00 PM

कल्याण : आज मध्य रेल्वेच्या कल्याण-डोंबिवली मार्गावर सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक आहे. कल्याणचा सर्वात जुना पत्रीपूल पाडण्यासाठी हा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली मार्गावरील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मध्य रेल्वेकडून 140 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले. गरज असेल तरच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे तर्फे नागरिकांना करण्यात आले.

हा विशेष मेगा ब्लॉक रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत असेल. ब्लॉक संपताच लोकल सेवा पूर्ववत सुरु होतील. रविवार सकाळची शेवटची लोकल ही कर्जतसाठी सीएसएमटीहून 8.16 वाजता सोडण्यात येईल, तर सीएसएमटी साठीची शेवटची लोकल ही सकाळी 9.09 मिनिटांनी सोडण्यात येईल. या मेगा ब्लॉकचा परिणाम हा केवळ कल्याण-डोंबिवली दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीवर पडेल. कल्याण ते कर्जत, कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवली दरम्यानची लोकल सेवा नियमित सुरु राहिल. त्याशिवाय काही विशेष लोकल गाड्याही सोडण्यात येतील.

मनमाड एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, जालना जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय इतर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रक आणि शेवटचे थांबेही बदलले गेले आहेत.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण-डोंबिवली दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याची विनंती मध्य रेल्वे कडून तेथील महापालिकेला करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें