VIDEO | “रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?” ‘स्टाईल’ फेम अभिनेत्याचा सवाल, किशोरी पेडणेकरांनी सिक्रेट सांगितलं

मुंबईचं पूर्ण प्रेशर तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत कसे सहन करता? असा प्रश्न साहिल खानने महापौरांना विचारला (Sahil Khan Kishori Pednekar)

VIDEO | रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता? 'स्टाईल' फेम अभिनेत्याचा सवाल, किशोरी पेडणेकरांनी सिक्रेट सांगितलं
साहिल खानची किशोरी पेडणेकर यांच्याशी भेट
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 2:22 PM

मुंबई : ‘स्टाईल’ चित्रपटातून प्रसिद्धीस आलेला बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांची भेट घेतली. “रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही न थकता काम करता, संपूर्ण मुंबई शहराचा भार सहन करता, नेमकं काय खाता?” असा मिश्किल सवाल साहिलने विचारला. त्यावर किशोरी पेडणेकरांनी आपलं सिक्रेट सांगितलं. (Style Actor Sahil Khan meets Mumbai Mayor Kishori Pednekar)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे साहिल खान याची भेट होईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले. मात्र इतक्या रात्री महापौरांचा उत्साह आणि कामाचा धडाका पाहून साहिल अवाक झाला. सुरुवातीला किशोरी पेडणेकरांच्या पाया पडून त्याने आशीर्वाद घेतले. हा व्हिडीओ महापौरांनी आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन शेअर केला आहे.

साहिल खानचा सवाल

“रात्रीचे 11 वाजले आहेत. काय खाता तुम्ही? कोणता डाएट करता? आम्हालाही आशीर्वाद द्या… मुंबईचं पूर्ण प्रेशर तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत कसे सहन करता? आम्ही इतके तरुण असून तुम्हाला काम करताना पाहून लाज वाटते” अशा भावना साहिल खानने व्यक्त केल्या.

किशोरी पेडणेकरांचे सिक्रेट

“सकारात्मक विचार किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग हीच माझी एनर्जी आहे. चांगले विचार करा, चांगलं काम करा. वयोमानानुसार थकवा तर येतोच, पण ज्या पदावर मी बसलेले आहे, तिथे माझी प्रत्येकाला गरज आहे, हे समजून मी काम करते” असं उत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. (Style Actor Sahil Khan meets Mumbai Mayor Kishori Pednekar)

किशोरी पेडणेकरांचे लसीकरण

वांद्रे-कुर्ला संकुलातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणानंतर घरी गेल्यावर धावपळ न करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी या ज्येष्ठांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशीही केली होती. किशोरी पेडणेकर यांनीही कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | आमच्या कुंदा वहिनी वयस्कर, राजसाहेब एक विनंती करते, महापौरांनी हात जोडले

…तर कॅटरिंग व्यावसायिकांसाठी सवलतीचा विचार होऊ शकतो : किशोरी पेडणेकर

(Style Actor Sahil Khan meets Mumbai Mayor Kishori Pednekar)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.