AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीकरणानंतर घरी गेल्यावर धावपळ करू नका, महापौरांनी केली ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस

वांद्रे-कुर्ला संकुलातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (3 मार्च) भेट दिली.

लसीकरणानंतर घरी गेल्यावर धावपळ करू नका, महापौरांनी केली ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस
| Updated on: Mar 03, 2021 | 6:16 PM
Share

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (3 मार्च) भेट दिली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणानंतर घरी गेल्यावर धावपळ न करण्याचा सल्ला दिलाय. यावेळी त्यांनी या ज्येष्ठांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशीही केली (Kishori Pednekar visit Covid vaccination program in Mumbai).

महापौर किशोरी पेडणेकर ज्येष्ठ नागरिकांशी संवाद करताना म्हणाल्या, “आपल्या सहकार्यामुळे या केंद्रावर दुपारी 1 वाजेपर्यंत 60 वर्षांवरील 977 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. लसीकरणानंतर आपल्याला दिलेल्या वेळेपर्यंत तसेच आवश्यकता असेल तर आणखी काही वेळ आपण या ठिकाणी शांततेत बसू शकता.”

“घरी गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होत असेल तर आपल्याला दिलेल्या फॉर्मवर हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. त्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आपण महापालिकेकडे कधीही मदत मागू शकता. तसेच घरी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची धावपळ न करता आराम करून स्वतःची काळजी घ्यावी,” अशीही सूचना महापौरांनी यावेळी केली.

यावेळी लसीकरण झालेल्या काही नागरिकांनीसुद्धा आपली मनोगतं व्यक्त केली. यात त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरणाचं नियोजन अत्यंत चांगलं असल्याचं सांगत कौतुक केलं. याठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था अत्यंत चांगली असल्याची भावना बहुतांश नागरिकांनी महापौरांसमोर व्यक्त केली. यावेळी उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर, वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो कोविड समर्पित रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय महापौर पेडणेकर यांनी घेतला.  कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौरांनी हे पाऊल उचललं. इतकंच नाही तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दरम्यान, आता गृह विलगीकरणात कुणाला न ठेवत आता आम्ही सर्वांना काळजी केंद्रात ठेवणार आहोत. तसंच परदेशातून येणारे आणि पळून जाणाऱ्या नागरिकांवर आम्ही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असं महापौरांनी सांगितलं.

हेही वाचा :

अवैध ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्यांविरोधात महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये, धाडी टाकण्याचा इशारा

ट्राम आली रे… मुंबईकरांना ब्रिटिशकालीन ट्राम पाहता येणार, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

…तर कॅटरिंग व्यावसायिकांसाठी सवलतीचा विचार होऊ शकतो : किशोरी पेडणेकर

व्हिडीओ पाहा :

Kishori Pednekar visit Covid vaccination program in Mumbai

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.