Devendra Fadnavis: चांद्यापासून बांद्यापर्यंत ,सुधीर मुनगंटीवार म्हणतात देवेंद्र फडणवीसांच मन विशाल

भाजपचा कार्यकर्ता हा सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करतो, त्यामुळे या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस नाराज नसल्याचे सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा देशासाठी का करत आहे असंही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: चांद्यापासून बांद्यापर्यंत ,सुधीर मुनगंटीवार म्हणतात देवेंद्र फडणवीसांच मन विशाल
देवेंद्र फडणवीस यांचे मन विशालःसुधीर मुनगंटीवार
Image Credit source: tv9arathi
महादेव कांबळे

|

Jun 30, 2022 | 8:40 PM

मुंबईः राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची ज्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. त्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Deputy Minister Devendra Fadnavis) यांनी आपण मंत्रि मंडळाच्या बाहेर राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अनेकांना त्यांच्या या वक्तव्यामुळे धक्का बसला. मात्र तो धक्का जास्त काळ न राहता जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटमुळ राज्यातील राजकारणात आणखी ट्विस्ट आले. भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांच्या या ट्विटनंतर काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्य़े उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतरही अनेक क्रिया प्रतिक्रिया उमटल्या.

त्या क्रिया प्रतिक्रियांवर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी टीव्ही नाईनशी बोलताना सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते कधी सत्तेसाठी काम करत नाहीत तर सत्यासाठी काम करतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची झालेली निवड ही पक्षाच्या निर्णयानुसार झाली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाची शिदोरी

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाची शिदोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी रहावी, त्यांना त्यांचे अनुभव देण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवाची आणि त्यांच्या नेतृत्वाचा फायदा एकनाथ शिंदे यांनाही व्हावा त्यामुळेही पक्षाकडून त्यांच्यावर जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत

तसेच चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या असणाऱ्या जनतेची आणि एकूण महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी तुमच्या अनुभवाची शिदोरी, तो अनुभव त्यांच्या पाठीशी उभा करावा म्हणून त्यांना हे नेतृत्व दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी

भाजपचा कार्यकर्ता हा सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करतो, त्यामुळे या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस नाराज नसल्याचे सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा देशासाठी का करत आहे असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाच्या या निर्णयामुळे ते नाराज नसून देवेंद्र फडणवीसांचे मन विशाल आहे असंही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांना अनुभवाचा फायदा

पक्षाने दिलेल्या या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस हे नाराज नसून त्यांच्या अनुभवाचा फायदा एकनाथ शिंदे यांना नक्कीच होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या या निर्णयामुळे ते नाराज नसून महाराष्ट्राच्या राजकीय प्रगतीचा हा मास्टरस्ट्रोक आहे असंही त्यांनी सांगितले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें