विभक्त पतीच्या टिकेनंतर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट, म्हणाल्या सगळे पर्याय हरतील तेव्हा तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे…

सुषमा अंधारे यांनी लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये आपल्या लेकीला उद्देश्यून त्या लिहिताता की, बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आहे.

विभक्त पतीच्या टिकेनंतर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट, म्हणाल्या सगळे पर्याय हरतील तेव्हा तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे...
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 10:13 PM

मुंबईः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीचे शिंदे गटात जाण्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यावरुनच सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीने त्यांच्या टीका केली आहे. त्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या लहान लेकीचा सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी दुबईला व्याख्यानाला जातानाचा प्रसंग शेअर केला आहे. यावेळी त्यांनी दुबईला जाताना त्यांना सोसावा लागणारा त्रास आणि लेकीला सोडून त्या कशा दुबईला गेल्या याबाबत त्यांनी भावूनपणे पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लेकीच्या मामाने म्हणजेच त्यांच्या भावाने आपल्या भाचीला कसं सांभाळलं आहे ही गोष्टही त्यांनी शेअर केली आहे.

सुषमा अंधारे यांनी लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये आपल्या लेकीला उद्देश्यून त्या लिहिताता की, बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आहे.

आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. त्यामुळे आपल्यावर होणारी टीका कशा असतील आणि त्याबद्दल आपल्याला काय वाटेल याबद्दल लिहिताना त्यांनी लिहिले आहे की, या प्रवासात बऱ्याचदा आपले पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलं आहे असा विश्वासही त्यांनी आपल्या मुलीला दिला आहे.

आपल्या मुलीला आपल्या होणाऱ्या टीका टिप्पणीबद्दल सांगताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचाही दाखला त्यांनी दिला आहे. त्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देताना त्यांनी लिहिले आहे की, बाबासाहेब लिहितात, जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील, भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत.

तर त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील असंही त्यांनी आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

त्यापुढेही त्यांनी लिहिले आहे की, पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील. त्यामुळे भय, भ्रम, चरित्र, हत्या ही मनुवादी अस्त्रं आहेत यांच्यापासून सावध राहण्याचा जो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे त्याचा त्यांनी दाखला दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.