AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kishori Pednekar : घाटकोपर येथील मृत मुलीच्या कुटुंबियांची महापौरांनी भेट घेऊन केले सांत्वन

आर्याचा मृत्यू लसीकरणामुळे नाही तर अभ्यासाच्या अतिरिक्त तणावातून हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याची माहिती आर्याच्या आजोबांनी दिली, असे प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Kishori Pednekar : घाटकोपर येथील मृत मुलीच्या कुटुंबियांची महापौरांनी भेट घेऊन केले सांत्वन
घाटकोपर येथील मृत मुलीच्या कुटुंबियांची महापौरांनी भेट घेऊन केले सांत्वन
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 7:32 PM
Share

मुंबई : घाटकोपर येथील 15 वर्षीय मुलीचा लसीकरणाने मृत्यू झाल्याचे आरोप करणारे वृत्त व छायाचित्र समाज माध्यमांमध्ये पसरल्यानंतर, त्याबाबतची वस्तुस्थिती आणि सत्यता जाणून घेण्यासाठी तसेच मृत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर येथे संबंधित कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. 15 वर्षीय आर्या नामक मुलीचा कोविड लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचे आरोप करणारे वृत्त समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित मुलीच्या कुटुंबीयांची घाटकोपर येथील निवासस्थानी आज भेट घेतली. या कुटुंबीयांना धीर दिला तसेच सांत्वनही केले. याप्रसंगी आमदार दिलीप लांडे, नगरसेवक किरण लांडगे, एस विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) महादेव शिंदे आदी उपस्थित होते.

समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेल्या पोस्टमुळे खळबळ

समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असेलेल्या या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. पालक आणि विद्यार्थी हे देखील यामुळे संभ्रमात आहेत. यामुळे मुंबई महानगर पालिकेने याची दखल घेतली आहे. स्वतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मुलीच्या कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी महापौरांनी तिच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून सविस्तर माहिती घेतली आणि त्यांचे सांत्वनही केले. महापौरांनी यावेळी अश्या प्रकारचे फेक मॅसेज व्हायरल करणाऱ्यांना असे करू नये म्हणून विनंती देखील केली.

15 ते 18 वयोगटातील मुले संक्रमित होऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आर्याचे छायाचित्र आणि वृत्त ज्या पद्धतीने समाज माध्यमांवर पसरविण्यात आले आहे, ते सर्व बनावट समाज माध्यम खात्यांवरून आणि गैर हेतूने केले जात असल्याचे सहज लक्षात येते. ही मंडळी आर्याच्या कुटुंबीयांना धीर न देता, या घटनेचा राजकीय वापर करीत आहेत. तसेच त्यातून कोविड लसीकरण मोहिमेला बदनाम करण्याचा प्रकार करीत आहेत. याप्रकारचे घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळीचा मी निषेध व धिक्कार करीत असल्याचे महापौरांनी सांगितले.

आर्याचा मृत्यू लसीकरणामुळे नाही हृदविकाराच्या झटक्याने

आर्याचा मृत्यू लसीकरणामुळे नाही तर अभ्यासाच्या अतिरिक्त तणावातून हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याची माहिती आर्याच्या आजोबांनी दिली, असे प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ह्या दुःखद प्रसंगी कोणीही यामध्ये राजकारण आणता कामा नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

आमदार दिलीप लांडे प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हणाले की, आर्याच्या आजोबांनी आताच वस्तुस्थिती सांगितली आहे. यामध्ये त्यांचे मत सर्वाधिक महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. महापौरांसोबत मी आज या ठिकाणी आल्यानंतर सदर कुटुंबियांना धीर दिला, तसेच त्यांचे सांत्वन केले. यानंतरही आर्याच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. (The mayor visited the family of the deceased girl at Ghatkopar)

इतर बातम्या

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

VIDEO: भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही, पालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची ‘वाझेगिरी’; आमदार साटम यांची टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.