देशातला सर्वात श्रीमंत व्यक्तीही रडला, कारण तो बाप होता…!

मुंबई : भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि अब्जाधीश उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल हे दोघे 12 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. संपूर्ण विश्वाचं लक्ष या ग्रँड लग्न सोहळ्याकडे होतं. हा संपूर्ण भव्य सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. रात्री सुमारे 4 वाजता नवरीची विदाई झाली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी […]

देशातला सर्वात श्रीमंत व्यक्तीही रडला, कारण तो बाप होता...!
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि अब्जाधीश उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल हे दोघे 12 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. संपूर्ण विश्वाचं लक्ष या ग्रँड लग्न सोहळ्याकडे होतं. हा संपूर्ण भव्य सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. रात्री सुमारे 4 वाजता नवरीची विदाई झाली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नवविवाहित जोडप्याला त्यांच्या आवाजातून शुभेच्छा दिल्या आहेत. गायंत्री मंत्र रेकॉर्ड केलेला व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओतून लग्नातले खास प्रसंगही दाखवण्यात आले आहेत. देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी अत्यंत भावूक झालेले या व्हिडीओत दिसत आहे.

श्रीमंत असो किंवा गरीब, बाप हा बाप असतो. मुकेश अंबानी यांच्यातला बापही जगाला पाहायला मिळाला. मुलीच्या गळ्यात वरमाला टाकताच मुकेश अंबानी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या नीता अंबानीही अत्यंत भावूक झाल्या होत्या.

या लग्नासाठी अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांचीही उपस्थिती होती. शिवाय माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, गृहमंत्री राजनाथ सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचीही उपस्थिती होती.

अंबानींची मुंबईतील अँटिलिया ही 27 मजली बिल्डिंग नवरीसारखी सजवण्यात आली होती. घरच्या प्रवेशद्वारापासून ते घरापर्यंत विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती. घराच्या परिसरातील रस्तेही सजवल्यामुळे सौंदर्य आणखी वाढलं होतं.

अंबानी कुटुंबीयांच्या या लग्नातल्या पाहुण्यांची यादी मोठी आहे. भारतच नव्हे तर जगभरातून या लग्नसोहळ्यासाठी पाहुणे आले होते. अंबानींनी या लग्नासाठी कोट्यवधींचा खर्च तर केलाच, शिवाय अन्नदानाचाही कार्यक्रम ठेवला होता.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें