AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NDA ची ताकद …. शिंदे पवारांच्या बैठकीनंतर योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य… राज्याच्या राजकारणात महाभूकंप?

Yogesh Kadam on Pawar-Shinde Meetings: ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने राजकारण चांगलेच तापले. या भेटीवर संजय राऊतांनी तोंडसुख घेतले. तर दुसरीकडे मंत्री योगेश कदम यांनी मोठे सूचक विधान करून खळबळ उडवली.

NDA ची ताकद .... शिंदे पवारांच्या बैठकीनंतर योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य... राज्याच्या राजकारणात महाभूकंप?
शरद पवार, एकनाथ शिंदे, योगेश कदम
| Updated on: Jul 09, 2026 | 11:48 AM
Share

Yogesh Kadam on Pawar-Shinde Meetings: कालचा दिवस राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट झाली. स्वागत आणि आदरातिथ्य झाल्यानंतर जे घडले, त्याने सगळेच अवाक झाले. शिंदे यांच्या दालनातच शरद पवार यांनी त्यांच्या आमदारांची बैठक घेतली. पवार NDA सोबत घरोबा करणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली. या भेटीवर आज खासदार संजय राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. तर त्याचवेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठे सूचक विधान केले. त्यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच आहे. पण एका राजकीय भूकंपाची नांदीही दिली आहे.

येत्या काळात NDA ची ताकद वाढणार

मंत्री योगेश कदम यांनी शिंदे यांच्या दालनात पवारांची भेट आणि आमदारांच्या बैठकीवर मोठी प्रतिक्रिया दिली. आपल्याला लवकरच समजेल, निश्चितच केंद्र सरकारमध्ये असूद्यात की राज्य सरकारमध्ये असूद्यात 2029ची विधानसभा, लोकसभेला अजून अवधी आहे. मात्र पुढच्या काही दिवसात आपल्याला चांगले निर्णय झालेले दिसतील. राज्यात महायुतीची आणि देशात एनडीएची ताकद वाढताना आपल्याला दिसेल, असे सूचक वक्तवय योगेश कदम यांनी केले.

संजय राऊत सांगणार का पवारांनी काय करायचं ते ?

गुरू शिदेंना भेटले म्हणून चेल्याला वाईट वाटलं असेल, कदाचित चेल्याला सगळॅकाही सांगणं गुरूंनी बंद केलं असावं, असा सणसणीत टोलाही योगेश कदम यांनी राऊतांना लगावला. राऊत हे कधीच शिवसेनेचे नव्हते. ते शरद पवार यांचे चेले आहेत असे वक्तव्य कदमांनी केले. ही भेट म्हणजे भविष्यातील राजकिय घडामोडींची एक नांदी आहे .संजय राऊत यांना वाईट वाटणं सहाजिक आहे. पण एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे नेत आहेत, असे वक्तव्य योगेश कदम यांनी केले आहे.

पंचतारांकित भेटीने मोठे वादळ

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या शुक्रवारी बैठक झाली. त्याची कुणकुण महाविकास आघाडीतील नेत्यांनाही लागली. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी घरोबा करण्याच्या चर्चांना एकच हवा मिळाली. जयंत पाटील यांनी भेटीची कबुली दिली. पण ही औपचारिक भेट असल्याचे म्हटले. लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीए अथवा महायुतीत नवीन कोणी दाखल होणार नसल्याचे वक्तव्य केले. तर शरद पवारांनी यांनी हे वृत्त फेटाळले. त्यावरून चर्चांना विराम मिळाला. तर बुधवारी शरद पवार हे विधानभवनात गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. भेटीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची तिथेच भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Follow Us
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?