लॉकडाऊनदरम्यान ज्वेलर्ससमोर खड्डा खणला, खुदाई करत करत भुयार बनवून ज्वेलर्स लुटलं

ज्वेलर्सच्या दुकानासमोर भुयार खोदून दुकान लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Thieves stole jewellery shop).

लॉकडाऊनदरम्यान ज्वेलर्ससमोर खड्डा खणला, खुदाई करत करत भुयार बनवून ज्वेलर्स लुटलं
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 6:34 PM

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशातील (Thieves stole jewellery shop) लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन सुरु असताना चोरीचे प्रकार सर्रास सुरु आहेत. मुंबईच्या अंधेरी येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ज्वेलर्सच्या दुकानासमोर भुयार खोदून ज्वेलर्सचं दुकान लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Thieves stole jewellery shop).

या दुकानाचं नाव महावीर ज्वेलर्स असं आहे. चोरट्यांनी काल (23 एप्रिल) मध्यरात्री ज्वेलर्ससमोरच खड्डा खोदला. त्यानंतर तिथूनच त्यांनी खुदाई करत ज्वेलर्सच्यादिशेला भुयारी मार्ग बनवला. या भुयारीमार्गाने त्यांनी ज्वेलर्समध्ये प्रवेश करत संपूर्ण दुकान लुटलं आणि त्यानंतर चोरटे पसार झाले.

देशभर लॉकडाऊन म्हणजेच संचारबंदी सुरु आहे. मात्र, या संचारबंदीच्या काळातही गुन्हेगार सक्रिय आहेत. शहरात गोळीबार, चोरीचे प्रकार सुरुच आहेत. त्यांना पोलिसांची आणि कोरोनाचीदेखील भीती नाही. पोलीस सतत 24 तास पहारा देत आहेत. मात्र, तरीही काही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. गेल्या दोन दिवसात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत.

डोंगरीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याविरोधात कारवाई

डोंगरी पोलिसांनी पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई केली आहे. डोंगरी पोलिसांनी कारवाई करुन दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मोहसीन खान आणि चिजोको अनमसोनये अशी त्यांची नावे आहेत. चिजोको हा नायजेरियन आहे. खान याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी हे अंमली पदार्थ सापडलं तर चिजोको याच्याकडे बियर सापडल्या. पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन खानच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक देशी पिस्तुल आणि एक जिवंत कट्टा सापडला.

माहिम परिसरात गोळीबार

माहिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल (22 एप्रिल) गोळीबार झाला. फिर्यादी असिफ रशीद मेहता यांचा आरोपी रिझवान याच्यासोबत वाद झाला होता. काल हे दोघे समोरासमोर आले असता त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. यावेळी फिर्यादीने आरोपी रिझवानवर बाटली फेकून मारली. यावेळी रिझवानने आपल्या जवळच्या रिव्हॉल्वरमधून फिर्यादी असिफ मेहता यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या प्रकरणात आरोपी रिझवान याला अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे.

एपीएमसी भागात गुटखा आणि पैशांची तस्करी 

एपीएमसी पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गुटखा आणि पैशांची तस्करी उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक ऑटोरिक्षा आणि एक कायनॅटिक होंडा मोटार सायकल जप्त केली आहे. यातील एक इसम एक लाख चाळीस हजार रुपयांचा गुटखा घेऊन चालला होता तर एक जण एक लाख पन्नास हजार रुपये रोकड घेऊन जात होता.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.