Shiv Sena:हा तर लोकशाहीचा खून, संविधानाची पायमल्ली, गटनेतेपद रद्द झाल्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया, अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढाई लढणार

हा तर संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. या विरोधात कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Shiv Sena:हा तर लोकशाहीचा खून, संविधानाची पायमल्ली, गटनेतेपद रद्द झाल्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया, अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढाई लढणार
पुन्हा एकत्र येणार का?
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:37 PM

मुंबई– विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची ऑक्टोबर २०१९ मध्ये केलेली नियुक्ती हीच विधिमंडळ सचिवालयाने कायम ठेवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने दिलेल्या पत्रावर निर्णय देत अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची गटनेतेपदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेते असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची प्रतोदपदी नियुक्ती रद्दबातल ठरवत भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का मानण्यात येतो आहे. एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतमध्ये असताना त्यांची गटनेतेपदावरुन उचलबांगडी करत अजय चौधरी यांना गटनेते पद देण्यात आले होते. तसेच सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १६ आमदारांनी व्हीप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र करावे, अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली होती. झिरवळांनी यासाठी तीन दिवसांचा कालावधी या बंडखोर आमदारांना दिला होता. मात्र त्यापूर्वीच विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव या बंडखोर आमदारांनी दाखल केला होता. त्यामुळे ज्यांच्यावर अविश्वास आहे असे उपाध्यक्ष अपात्रतेची नोटीस देऊ शकत नाहीत, असे शिंदे गटाचे म्हणणे होते. य़ावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, त्यावर आता ११ जुलैला सुनावणी होणार आहे.  या पत्रानंतर शिवसेनेच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रकार, कोर्टात जाणार-अरविंद सावंत

हा तर संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. या विरोधात कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संविधानाला पायदळी तुडवून हा निर्णय घेण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया अरविंद सावंत यटांनी दिली आहे. देशाची वाटचाल ही हुकुमशाही कडे जात असल्याचे हे उदाहरण आहे,  अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.

अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढा देऊ- अजय चौधरी

विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी आपल्या नावाला मंजुरी दिली होती. याबाबत शिवसेनेची अधिकृत बैठक झाली होती. गटनेते ठरवण्याचा अधिकार हा विधीमंडळाला कसा, असा प्रश्न अजय चौधरी यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे याचा निर्णय तिथेच होईल, असे चौधरी यांनी सांगितले आहे. अखेरच्या क्षणापर्यंत याविरोधात न्यायायलीन लढा देऊ, असे चौधरी यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

हा तर लोकशाहीचा खून -सुनील प्रभू

असा निर्णय झाला असेल तर लोकशाहीचा खून आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानेच गटनेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी आपली नियुक्ती झालेली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे, यावर सुप्रीम कोर्टातच निर्णय घेऊ शकेल. कायदा काय सांगतो आणि न्यायालय काय म्हणेल, हे महत्त्वाचं आहे. सु्प्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर याबाबतची प्रतिक्रिया ठरेल. असेही सुनील प्रभू यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.