5

TRP Scam | मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ‘या’ चॅनेलचा सर्व्हर जप्त, प्रसारणास बंदी

कॉपीराईट प्रकरणात महामुव्ही विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. (TRP scam case MahaMovie Server and content seal)

TRP Scam | मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, 'या' चॅनेलचा सर्व्हर जप्त, प्रसारणास बंदी
मुंबई पोलीस
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 7:37 PM

मुंबई : मुंबईच्या गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने (Criminal Interdiction Unit) मोठी कामगिरी केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपी महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे. त्यामुळे आता चॅनलला प्रसारण करता येणार नाही. दरम्यान या प्रकरणी दर्शन सिंह आणि विश्वजित शर्मा यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. (TRP scam case MahaMovie Server and content seal)

टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून पदार्फाश करण्यात आला होता. जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या कॉपीराईट प्रकरणात महामुव्ही विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर गुन्हे शाखेने ‘महामुव्ही’ वाहिनीच्या प्रवर्तक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांना अटक केली होती. यानंतर आता महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे.

महामुव्हीपासून लावारिस, जंजीर, मोहब्बत के दुश्मन, मुकद्दर का सिकंदर आणि जादूगार अशा सिनेमाची कंटेंट जप्त केली आहे. यापूर्वी, बॉक्स सिनेमाच्या सर्व्हर आणि कंटेंटला गेल्या आठवड्यात सील करण्यात आला आले आहे. ते चॅनेलही यापुढे प्रसारित होणार नाही.

त्याशिवाय महामुव्ही चॅनलचा आर्थिक लेखापरीक्षण (financial audit) केले जाणार आहे. तसेच दर्शन सिंह यांच्यावर एलओसी (लुक आऊट नोटीस) जारी करण्यात आली आहे. (TRP scam case MahaMovie Server and content seal)

काय आहे प्रकरण?

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. (TRP scam case MahaMovie Server and content seal)

संबंधित बातम्या : 

TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?

TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक

Non Stop LIVE Update
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
रामेश्वर धबधबा प्रवाहित, पर्यटकांना पर्वणी; बघा धबधब्याची विहंगम दृश्य
रामेश्वर धबधबा प्रवाहित, पर्यटकांना पर्वणी; बघा धबधब्याची विहंगम दृश्य
'म्हणून पत्रकारांना चहाला न्या', बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना?
'म्हणून पत्रकारांना चहाला न्या', बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना?
'म्हणून पंकजा मुंडेंच्या कारखान्याला नोटीस',बच्चू कडूंनी सांगितलं कारण
'म्हणून पंकजा मुंडेंच्या कारखान्याला नोटीस',बच्चू कडूंनी सांगितलं कारण
पंकजा मुडेंच्या अडचणीत वाढ, वैद्यनाथ साखर कारखान्याला कुणाची नोटीस ?
पंकजा मुडेंच्या अडचणीत वाढ, वैद्यनाथ साखर कारखान्याला कुणाची नोटीस ?
'सहकार महर्षींचे आख्यान!', अमित शाहांवर सामनातून राऊतांचा निशाणा काय?
'सहकार महर्षींचे आख्यान!', अमित शाहांवर सामनातून राऊतांचा निशाणा काय?