Lok Sabha election 2024 | महादेव जानकरांसारखी राजू शेट्टींवर शंका, जयंत पाटलांकडून इशारा, आता काय घडलं

| Updated on: Mar 26, 2024 | 11:04 PM

महाविकास आघाडीशी जवळीक साधून महादेव जानकर महायुतीतच परतले. आता अशीच शंका जयंत पाटलांनी, राजू शेट्टींबद्दल व्यक्त केलीय. राजू शेट्टींची भूमिका वेगळी दिसतेय असं जयंत पाटील म्हणालेत. तर राजू शेट्टींनी आपण महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही हे स्पष्ट केलंय.

Lok Sabha election 2024 | महादेव जानकरांसारखी राजू शेट्टींवर शंका, जयंत पाटलांकडून इशारा, आता काय घडलं
raju shetti
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांसोबत चर्चा करणारे महादेव जानकर 2 दिवसांआधीच महायुतीकडेच आले. आता स्वाभिमानीच्या राजू शेट्टींवरुन जयंत पाटलांनीच शंका व्यक्त केली. राजू शेट्टींचा वेगळा पवित्रा दिसत असून ते महाविकास आघाडीसोबत न आल्यास हातकणंगलेतून मविआचा उमेदवार द्यावा लागेल, असा इशाराच जयंत पाटलांनी दिला. 2015पासून भाजपविरोधी भूमिका घेतली असून आपण पुन्हा त्यांच्यासोबत जाणार नाही हे राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. त्याचवेळी महाविकास आघाडीतही जाणार नाही. पण त्यांनी पाठींबा जाहीर केल्यास घेणार, हेही राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय.

महाविकास आघाडीत हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरेंकडे आहे. राजू शेट्टी मातोश्रीवर राजू शेट्टींना भेटलेही. पण अद्याप राजू शेट्टींनी भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. आता महाविकास आघाडीत सहभागी होणार नसल्याचं राजू शेट्टींनी क्लिअर केल्यानं, राऊतांनीही महाविकास आघाडीत चर्चा करुन ठरवू असं म्हटलंय.

राजू शेट्टी 2009 आणि 2014 असे दोन वेळा हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये राजू शेट्टी 95 हजार मतांनी जिंकत पहिल्यांदा खासदार झाले. 2014 मध्ये तब्बल 1 लाख 77 हजार मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले आणि 2019मध्ये 96 हजार मतांनी पराभव झाला. इथं वंचित फॅक्टर महत्वाचा ठरला. वंचितच्या उमेदवारानं सव्वा लाख मतं घेतली.

पाहा व्हिडीओ:-

2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार असताना राजू शेट्टींनी त्यांना पाठींबा दिला होता..मात्र शेतकऱ्यांच्या विषयावरुन राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडले. आता राजू शेट्टी पाठींबा मागतायत पण महाविकास आघाडीत येण्यास तयार नाहीत. त्यामुळं निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे.