Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पुणे अपघात प्रकरणातील नातवाला वाचवण्याचा आजोबांचा डाव पोलिसांनी उधलळा, पाहा Video
पुणे अपघातावरुन अग्रवाल कुटुंबात आणखी एक अटक झालीय. आरोपी वेदांत अग्रवालच्या आजोबालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नातवाला वाचवण्यासाठी सुरेंद्र अग्रवालनं ड्रायरव्हवर दबाव टाकण्यासाठी त्याला डांबून ठेवलं होतं.

पुण्याच्या अपघात प्रकरणात, अग्रवाल कुटुंबातील बिघडलेला अल्पवयीन मुलगा. पैशांची मस्ती असलेला बिल्डर बाप आणि नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरचं अपहरण करणारे आजोबा तिघेही कोठडीत गेलेत. म्हणजेच, अग्रवाल कुटुंबातल्या 3 पिढ्या कोठडीत आहेत. दारु पिवून दोघांना चिरडणारा वेदांत अग्रवाल बाल सुधारगृहात गेलाय. वेदांतचे वडील विशाल अग्रवाल 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आता आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली असून 28 ताखरेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
वेदांतनं दारुच्या नशेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाला ठार केल्यानंतर, आजोबानं नातू वेदांतला वाचवण्यासाठी कार चालकालाच डांबून ठेवत स्वत:वर गुन्हा घेण्यासाठी धमकावलं, असं पुणे पोलिसांचं म्हणणंय. ड्रायव्हर गंगाधर पुजारीच्या तक्रारीनंतर सुरेंद्र अग्रवालवर अपरहणाराचा गुन्हा दाखल झालाय.
कोझी पब मध्ये दारु प्यायल्यानंतर म्हणजेच 19 तारखेला रविवारी पहाटे अडीच वाजता वेदांतनं बेदरकारपणे दोघांना उडवलं. अपघात झाला त्यावेळी कार चालक गंगाधर पुजारी समोरच्या सीटवर वेदांतच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसला होता. अपघाताच्या दिवशी रविवारी रात्री 11 वाजता ड्रायव्हरला येरवडा पोलीस स्टेशनमधून सोडण्यात आलं. त्यानंतर वेदांतचे वडील आणि आजोबा सुरेंद्र अग्रवालांनी बीएमडब्ल्यू गाडीत बसवून ड्रायव्हर गंगाधर पुजारीला बंगल्यावर नेलं.
ड्रायव्हरचाला घरी आणताच आजोबा सुरेंद्र अग्रवालांनी स्वत:वर गुन्हा घेण्यासाठी आमिष दिलं. मात्र नकार देताच मोबाईल हिसकावून घेतला आणि अपघाताची जबाबदारी घे नाही नाही तर याद राख अशी धमकी देत घरातच 2 दिवस डांबून ठेवल्याचं ड्रायव्हरनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. ड्रायव्हरच्या पत्नीनं पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवालांच्या घरुन चालकाची सुटका केली. अपघाताचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग झालंय. गुन्हे शाखेनं सुरेंद्र अग्रवालच्या घरावर छापेमारीही केली. ड्रायव्हर गंगाधर पुजारीला सोबत नेत अग्रवालच्या घरी सीन रिक्रियेशन केलं. म्हणजेच ड्रायव्हरला घरी आणल्यावर कुठं डांबून ठेवलं, कसं डांबून ठेवलं. नेमकं काय काय घडलं याची माहिती पोलिसांनी सीन रिक्रियेशनद्वारे घेतली.
वेदांतच्या दोघांना चिरडल्यानंतर, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात तो वेदांतचं असल्याचं भासवून त्याच्यावर आणखी चिड निर्माण करणारा व्हिडीओ सोशल मीडियात आला. मात्र हा आरोपी वेदांत नसून दिल्लीतला आर्यन निखरा आहे. कलम 509, 294 ब आणि आय टी कलम 67 नुसार पुणे पोलिसांकडून आर्यन निखरावर गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे आर्यन निखरानं HBT या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मुलाखत दिली आणि आपण प्रसिद्धीसाठी व्हिडीओ केल्याचं म्हटलंय. खूप चांगलं झालं असून मस्त प्रसिद्धी मिळाल्याचं आर्यननं म्हटलंय.
प्रसिद्धीसाठी व्हिडीओ केल्याचं सांगत आर्यन निखराला, पुण्यातल्या घटनेचं काहीही गां भीर्य नाही. म्हणजे हाही प्रसिद्धीसाठी हापापलेल्या कॅटेगरीचा आहे. ज्यांना मरायचं ते मरत राहणार असं बेजबाबदार पणे आर्यन निखरा बोलतोय. आता त्याच्या गुन्हा दाखल झाल्या…पुढच्या कारवाईनंतर त्याचा दिमाग ठिकाण्यावर येईल.
