AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याची राजकारणात एन्ट्री अन् शरद पवारांना साथ, पाहा व्हिडीओ

शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपसोबत जात सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. तर आता इकडे अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. यावरचाच टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याची राजकारणात एन्ट्री अन् शरद पवारांना साथ, पाहा व्हिडीओ
| Updated on: Feb 21, 2024 | 10:15 PM
Share

मुंबई : एकीकडे शरद पवारांचे सख्खे पुतणे सत्तेत गेले आणि दुसरीकडे अजित पवारांचेच सख्खे पुतणे शरद पवारांकडे आले आहेत. कोण आहेत युगेंद्र पवार ते शरद पवारांसोबत गेल्यानंतर अजित पवार गटानं काय टीका केलीय. काका शरद पवारांविरोधात त्यांचे सख्खे पुतणे अजित पवारांनी बंड पुकारुन भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्यानं शरद पवारांसोबत राहणं पसंत केलंय.  यावरील टीव्ही9 मराठीचा पाहा स्पेशल रिपोर्ट.

पाहा व्हिडीओ:-

माझ्या कुटुंबातले लोक विरोधात असतील., हे अजित पवार काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसारच अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी आम्ही शरद पवारांच्या बाजूनं असल्याचं स्पष्ट केलंय. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचे पुत्र आहेत. बारामतीच्या सभेत माझ्या घरचेही विरोधात जातील म्हणून अजित पवार भावूक झाले होते., मात्र घरचे होते तिथंच आहेत. विरोधात तुम्ही गेलात…म्हणून शरद पवार गटानं उत्तर दिलंय. दरम्यान सध्या राजकारणात एक पुतणे काकांविरोधात बंड पुकारतात आणि त्यानंतर त्याच पुतण्यांचे पुतणे आजोबांना साथ देतात याची चर्चा सुरु आहे.

शरद पवारांचे वडिल गोविंदराव पवार आणि त्यांच्या पत्नी शारदा पवार यांना एकूण ११ अपत्य, ७ मुलं आणि ४ मुली. त्यापैकी राजकारण, शेतीशी संबंधित 5 जण, शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार अजित पवारांचे वडील अनंतराव पवार स्वतः शरद पवार, प्रतापराव पवार आणि पवारांच्या बहिण एन.डी.पाटलांच्या पत्नी सरोज पाटील. आप्पासाहेब पवारांनी शेतीत अनेक प्रयोग केले. त्यांना दोन मुलं राजेंद्र पवार आणि रंजीत पवार, राजेंद्र पवारांनी शेतीचं काम पुढे नेलं.,

अनंतराव पवारांना सिनेमाचं वेड होतं., चित्रपट निर्माते व्ही.शांतारामांकडे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामही केलं. त्यांना 3 अपत्य. श्रीनिवास पवार, अजित पवार आणि विजया पाटील. शरद पवार. यांना एक मुलगी सुप्रिया सुळे. प्रतापराव पवार हे दैनिक सकाळ समुहाचे प्रमुख आहेत.

पवारांच्या तिसऱ्या पिढीतले काही जण व्यवसायात आहेत तर काही जण राजकारणात प्रतापराव पवारांचे पुत्र अभिजीत पवार सकाळ समुहाची जबाबदारी सांभाळतात. सुळेंना रेवती सुळे आणि विजय सुळे ही दोनं मुलं आहेत. राजेंद्र पवारांचे पुत्र रोहित पवार राजकारणात आहेत अजित पवारांच्या पार्थ आणि जय पवार ही दोन्ही मुलंही राजकारणात आलेयत. आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र अर्थात अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांची साथ दिलीय.

श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ आहेत. शेतीसह ऑटोमोबाईल्स क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे. श्रीनिवास पवार राजकारणात नसले. तरी राजकीय घडामोडींवेळी त्यांचं नाव चर्चेत राहिलंय., 2019 ला सत्तासमीकरणांच्या घडामोडीत अजित पवार श्रीनिवास पवारांना भेटायला गेले होते. राजकारणात मतभेद आहेत. मात्र कुटुंब म्हणून आमच्या कटूता नाही असं पवार कुटुंबियांकडून सांगितलं जातं

मविआ सरकार असताना कृषी योजनावरुन रोहित पवारांचे वडिल राजेंद्र पवारांनी भाजप सरकारबरोबरच नंतरच्या सरकारमध्येही कामं उशिरानं होत असल्याची तक्रार केली होती. त्यावर अजित पवारांनी दिलेलं उत्तर चर्चेत होतं. नंतरच्या एका कार्यक्रमात राजेंद्र पवारांच्या फिटनेसची स्तुती करुन अजित पवारांनी हश्या पिकवला होता. दरम्यान फूट राजकारणात असली तरी त्याचे परिणाम कुटुंबावरही होतात. एक पुतणे तिकडे गेले, आणि त्यांचेच पुतणे इकडे शरद पवारांकडे आले. एरव्ही दोनाचे चार होणं हे लग्नासाठी म्हटलं जातं. मात्र सध्या महाराष्ट्रात दोनाचे चार पक्ष झाले आहेत आणि काका-पुतण्यांवरुन रोज नवनव्या राजकीय चर्चा झडतायत.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.