AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांसाठी लोकल प्रवासाची घोषणा, भाजपची पहिली प्रतिक्रिया थेट दिल्लीतून

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र भाजपने थेट दिल्लीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र हा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला असं भाजपनं म्हटलंय.  

मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांसाठी लोकल प्रवासाची घोषणा, भाजपची पहिली प्रतिक्रिया थेट दिल्लीतून
CHANDRAKANT PATIL
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 9:26 PM
Share

मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयांची अंमलबजाणी होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र भाजपने थेट दिल्लीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र हा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला असं भाजपनं म्हटलंय. (Uddhav Thackeray allowed common people to travel by Mumbai local BJP leader Chandrakant Patil said it is late decision)

निर्णयाचे स्वागत पण उशीर झाला

राज्य सरकारच्या लोकसंदर्भातील निर्णयावर बोलताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी सरकारने हा निर्णय उशिरा घेतला असं म्हटलंय. “घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच आहे. नेहमी सकारात्मक राहायला पाहिजे. पण उशीर झाला. व्यापार सुरु झाला पहिजे असं विरोधी पक्ष म्हणत होता. लोकल सुरु व्हायला पाहिजे अशी आमची मागणी होती. तसेच मंदिरं सुरु व्हायला पाहिजेत. दीड ते दोन वर्षांपासून लोक बंदीस्त आहेत. लोक वेडे व्हायला लागले आहेत. दीड ते दोन वर्षांपासून अर्थार्जन बंद आहे. त्यामुळे हा वर्ग कसा जगला याबद्दल प्रश्नच आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारला जनतेच्या मानातलं समजत नाही त्याला काय करणार ?

उद्धव ठाकरे यांनी लोकल सुरु करण्याचा निर्णय घोषित करताना भडकावणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका असे वक्तव्य केले. भाजपने काल केलेल्या आंदोनलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले असावे असा अंदाज बांधला जात आहे. ठाकरे यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला. यावेळी बोलताना “हे सरकार आम्ही शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालवतो आहोत असं हे म्हणतात. पण छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेच्या मनातलं कळायचं. मात्र, या सरकारला जनतेच्या मनातलं समजत नाही त्याला काय करणार ?” असा टोला चंद्राकांत पाटील यांनी सरकारला लगावला.

सामान्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सामान्यांना मुंबई लोकलने प्रवास प्रवास करण्यास अनुमती देण्यात येत आहे, असं सांगितलं. “अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

इतर बातम्या :

मुंबई लोकलच्या प्रवासासाठी पास कशी मिळणार? वाचा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर

जिथे पूर आला तिथेच कोरोनाचं मोठं संकट घोंगावतंय? मुख्यमंत्र्यांचा 6 जिल्ह्यांना थेट अलर्ट

चिपळूण, महाडसाठी मुख्यमंत्र्यांचा दीर्घकालीन प्लॅन, धोकादायक वस्त्यांपासून ते पुराच्या पाण्यापर्यंत काय काय करणार?

(Uddhav Thackeray allowed common people to travel by Mumbai local BJP leader Chandrakant Patil said it is late decision)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.