अमित शाह यांच्या पुत्रमोहाच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, ‘तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत…’

"केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचं तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्यामुळे मी पुत्र प्रेम दाखवत नाही. त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे. अमित शाह यांचं पक्षातील नेमकं स्थान काय आहे? त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे. पण अमित शाह यांना सांगायचंय, तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्याचपाट्यात एक वाक्यता असू द्या", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

अमित शाह यांच्या पुत्रमोहाच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, 'तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत...'
अमित शाह आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 9:14 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भंडाऱ्यातील प्रचारसभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुत्रीप्रेमाने राष्ट्रवादी पक्ष फुटला, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचं तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्यामुळे मी पुत्र प्रेम दाखवत नाही. त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे. अमित शाह यांचं पक्षातील नेमकं स्थान काय आहे? त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे. पण अमित शाह यांना सांगायचंय, तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्याचपाट्यात एक वाक्यता असू द्या. फडणवीस म्हणाले होते. मी पुन्हा येईन. ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सलमान खानच्या घरावर गोळीबार, ठाकरे काय म्हणाले?

“ज्या पद्धतीने खुलेपणाने गुंडागर्दी सुरू आहे. सरकारला सत्ता चालवण्याचा अधिकार नाही. घटनाबाह्य सरकार सरकार चालवत आहे. गुंड कोणीही गोळीबार करत आहेत. यांच्यात त्यांना रोखण्याची हिंमत नाही. तो कोण आहे आला कसा, गोळीबार करून कसा जात आहे. यांचं लक्ष नाहीये”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मविआच्या संयुक्त सभा होणार?

“काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहे. दोन दिवसात होतील. आम्ही राज्यासाठी वचननामा वेगळा द्यायचा का यावर विचार करत आहोत. त्यानंतर सभांबाबत चर्चा होणार आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. “आमचं हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. आम्ही देशद्रोहींच्या विरोधात आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सांगलीच्या जागेवर काय म्हणाले?

“प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. आघाडी आणि युती होते तेव्हा काही गोष्टी सोडाव्या लागतात. अमरावती, रामटेक आणि कोल्हापूर या जिंकलेल्या जागा आम्ही दिल्या. भाजपला हरवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांना नेतृत्वाने समजून सांगितलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.